mahad
mahad 
कोकण

कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, आपत्ती व्यवस्थापन नाही

सुनील पाटकर

महाड (रायगड) : महाड औद्योगिक क्षेत्रामधील प्रिव्ही ऑरगॅनिक या कंपनीमध्ये काल लागलेल्या भिषण आगीनंतर महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या आगीनंतर आपत्ती व्यवस्थापन व त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींतील त्रुटी उघड झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये महाड, माणगाव(भागाड), रोहा, नागोठणे, तळोजा , रसायनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या वसलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लागत असलेल्या आगीमुळे व होत असलेल्या स्फोटांमुळे औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाडमधील प्रिव्ही या नामांकीत कंपनीमध्ये काल लागलेली आग व त्यानंतर हतबल झालेली यंत्रणा याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अग्निशमन यंत्रणा अपूरी
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या केंद्रामध्ये दोन अग्निशमन वाहने असून त्यापैकी एक वाहन कर्मचाऱ्यांअभावी वापरात नसते. त्यामुळे केवळ एका वाहनावरच या औद्योगिक क्षेत्रातील शेकडो रासायनिक कंपन्यांमचा डोलारा सांभाळावा लागत आहे. या अग्निशमन दलाच्या मर्यादा प्रिव्हीला लागलेल्या आगीदरम्यान स्पष्ट झाल्याने जेएसडब्ल्यु (थळ) हिंदुस्थान पेट्रोलियम यांची अद्यायावत व रासायनिक आग विझवू शकणारी वाहने मागावावी लागली होती.महाड औद्योगिक क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्या असून या कंपन्यांकडे स्वतःची किमान तीन ते चार अद्यावत अग्निशमन वाहने असणे गरजेचे असल्याचे यातून पुढे आले आहे. बाहेरून मागविलेल्या यंत्रणेने तात्काळ आग आटोक्यात आणू शकल्याने पुढील अनर्थ टळू शकला.

फायर हायड्रंट सिस्टिमचा बोजवारा
फायर हायड्रंट सिस्टिमचा औद्योगिक क्षेत्रात पुर्णपणे बोजवारा वाजल्याचे सत्य या घटनेने पुढे आले आहे. प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीकडून आग विझविण्यासाठी लागणा-या पाण्याची व्यवस्था करणारे फायर हायड्रंट (प्लग) संपूर्ण कारखान्यांभोवती बसवलेले गेलेले असतात.यासाठी स्वतंत्र पाणी व्यवस्ता केलेली असते.महाड औद्योगिक क्षेत्रातही सत्तावीस वर्षापूर्वी ही यंत्रणा कार्यान्वित केलेली होती. परंतु हे फायर हायड्रंट (प्लग) कोठे आहेत याची कल्पनाही नविन प्रशासनालाही नाही, तसेच काळानूसार  ही यंत्रणा विनावापर राहिल्याने या यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. आग विझविणा-या बंबाला त्याचठिकाणी तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी हे फायर हायड्रंट(प्लग) वापरली जाते.त्यामुळे वेळेची बचत होते व बंबाना थेट पाणी पुरवले जाते. परंतु फायर हायड्रंट(प्लग)ची वानवा यावेळी मोठ्या प्रमाणात जाणवली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कागदावर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका औद्योगिक क्षेत्रात फारशा होत नाहीत. पूर येणे व दरडी कोसळणे या पावसाळी कालावधीतच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागरूक असते. औद्योगिक क्षेत्रातील यंत्रणा, आपत्तीवरील उपाययोजना, नागरिकांमध्ये करावयाची जनजागृती यासर्वांची गरज यावेळी जाणवली. प्रिव्ही कंपनीतून बाहेर पडणारा धूर हा आरोग्याला फारसा हानीकारक नसतानाही अनेक गावे खाली करण्याबाबतचा गोंधळ प्रशासनामध्ये दिसून आला. अनेक औद्योगिक क्षेत्रात अश्या आपत्तींचे मॉकड्रील घेतले जाते. प्रिव्ही कंपनीत चार वर्षापूर्वी असे मॉक़ड्रील घेतले होते. परंतु त्यानंतर मॉकड्रीलबाबत औद्योगिक क्षेत्रात उदासिनता दिसून आली होती. मॉक़ड्रीलमध्ये मिळणारे प्रतिसाद व प्रत्यक्ष प्रतिसाद यातील तफावतही यातून पुढे आली

स्पॅनचे मजबुतीकरण आवश्यक
महाड औद्योगिक क्षेत्रात स्पॅन ही आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेले पथक फार चांगल्या प्रकारे काम करत असते. महामार्गावर रासायनिक वाहने व कंपनीतील अनेक अपघात या पथकात रोखले आहेत .परंतु या पथकात यापूर्वी कार्यान्वित असलेले अनेक अनुभवी,तज्ञ व साहसी मंडळी विविध कारणांवरून या पथकात नसल्याने या पथकाच्या मजबुतीकरणाची गरजही या निमित्ताने पुढे आली आहे. कारखान्यातील रसायने, आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी व लोकांवर होणारे त्याचे परिणाम याबाबतची जनजागृती या परिसरात वारंवार करणे आवश्यक आहे. प्रिव्ही सारखी नामांकीत कंपनीही ही आग आटोक्यात आणण्यात हतबल झालेली दिसून आली होती.आजुबाजुच्या कंपन्यानीही आपला परिसर आगी पासुन वाचविण्या ऐवजी कंपनी बंद करुन पळ काढण्यात धन्याता मानली. भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी चोख उपाययोजना व फायर आँडिट केले जाव्यात असा मुद्दा पुढे येत आहे.

सर्व कारखान्यांचे काटेकोरपणे फायर आँडिट होणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होउ नये यासाठी कारखान्यांनी काळजी घेतली पाहिजे.
- रविंद्र चव्हाण (पालकमंत्री, रायगगड)

या आगीत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.कामगारांची सुरक्षिततेला प्राधान्य दिले गेले.कामगारांची सर्व काळजी कोणत्याही स्थितीत कंपनी यापुढेही घेईल.
- संभाजी पठारे (उपाध्यक्ष, प्रिव्हि ऑरगॅनिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT