ndrf sakal
कोकण

Raigad News :रायगड जिल्ह्यामध्ये आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्‍ज; श्‍वानासह एनडीआरएफचे पथक तैनात

जिल्ह्यातील महाड व पोलादपूर हे दोन तालुके आपत्तीग्रस्त म्हणून ओळखले जातात

सकाळ वृत्तसेवा

महाड : रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कोणत्याही आपत्तीचा सामना तसेच बचाव कार्यायासाठी एनडीआरएफचे पथक दोन दिवसापूर्वी महाड येथे दाखल झाले आहे. यात २५ प्रशिक्षित जवानांसह श्वानाचाही समावेश आहे.

जिल्ह्यातील महाड व पोलादपूर हे दोन तालुके आपत्तीग्रस्त म्हणून ओळखले जातात. १९९४ पासून या दोन तालुक्यात सातत्याने दरड कोसळून मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी झाली आहे. २००५ मध्ये झालेल्‍या भूस्खलनात शेकडो जणांनी जीव गमावले होते.

तसेच तळिये येथील आपत्तीमध्ये ८६ जणांचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर महाड येथे आपत्तीकालीन पथकाची मोठी गरज भासत होती. सावित्री पूल दुर्घटना, तारिक गार्डन इमारत दुर्घटना यामध्ये तातडीने मदत कार्य मिळण्याकरिता अनेक उणिवा जाणवल्या होत्या. त्यामुळे महाड येथे पावसाळ्यातील चार महिने एनडीआरएफ पथक कायमस्वरूपी मुक्कामी असावे, असा निर्णय सरकारने घेतला होता.

त्यानुसार हे पथक महाडमध्ये दाखल झाले आहे. पथकामध्ये एनडीआरएफचे २५ जवान असून निरीक्षक सुजित कुमार पासवान यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील कोणत्याही भागात निर्माण होणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या आपत्तीचा सामना करण्याकरता ते सज्ज आहेत. बोटी, स्ट्रेचर, दोरखंड, टॉर्च, लाईफ जॅकेट याशिवाय इतर अनेक प्रकारची अत्याधुनिक साधनसामग्री पथकाजवळ आहे. याशिवाय एका श्‍वासाचाही समावेश असून दरड कोसळून अथवा ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली माणसे शोधण्यास फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT