Birds
Birds Sakal
कोकण

रायगड जिल्ह्यातील पक्षी निरीक्षण क्षेत्रं बहरली

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व समृद्ध निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या रायगड जिल्ह्यात पक्षांच्या तब्बल 350 प्रजाती सापडतात. मागील काही काळात येथील पक्षी निरीक्षण क्षेत्र विविध पक्षांनी बहरली आहेत. शिवाय सध्या येथे स्थलांतरित पक्षांची रेलचेल सुरू आहे. परिणामी पक्षांसह पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी ही क्षेत्र हॉटस्पॉट ठरत आहेत.

पक्षी निरीक्षणासाठी हॉटस्पॉट असलेली जिल्ह्यातील उत्तम ठिकाणे ही आहेत. उरण व पनवेल येथील समुद्र, खाडी किनारे, कांदळवने पाणथळ जागा, कर्नाळा पक्षी अभयारण्य. उरण येथे देश-विदेशातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी उत्तम हवामान वातावरण आहे. तिथे परदेशी व स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येत असतात. अलिबाग येथील आक्षी आणि रेवस येथील समुद्रकिनारा खाडी प्रदेश 60 हुन अधिक स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.

राम धरणेश्वर येथे 30 हून अधिक गरुड वर्गीय शिकारी पक्षी आढळतात. एकाच ठिकाणी इतक्या प्रजाती आढळणारे हे एकमेव ठिकाण आहे. सागरगड, सिद्धेश्वर, कनकेश्वर येथे अनेक प्रकारच्या वृक्ष प्रजाती व पक्षांसाठी उत्तम अधिवास आहे. श्रीवर्धन, म्हसळा येथे पांढऱ्या पाठीची व इतर प्रकारची गिधाडे आणि इतर पक्षांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुरुड येथील फणसाड अभयारण्य येथे 190 प्रकारचे पक्षी आढळतात. महाड, माणगाव, पाली, सुधागड, कर्जत व माथेरान समुद्र पक्षी वगळून इतर पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. तर स्थलांतरित तिबोटी खंड्या संपूर्ण जिल्ह्यात आढळतो.

पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. दमट हवामान, पानगळीची जंगले पक्षांसाठी विविध अधिवास, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, समुद्र आणि खाडीकिनारी असलेली कांदळवने, सदाहरित, निमसदाहरित व पानगळीची जंगले असे समृद्ध वातावरण व अधिवास पक्ष्यांच्या वाढ व विकासासाठी लाभदायक आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात विविध प्रकारचे असंख्य पक्षी राहत आहेत असे पक्षी निरीक्षक प्रवीण कवळे यांनी सांगितले

दुर्मिळ प्रजातीचे दर्शन

येथे दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्षांचे दर्शन देखील होते. त्यामध्ये थोरला धनेश (Great Pied Hornbill), मलबारी धनेश (Malabar Pied Hornbill), राखी धनेश (Indian Greay Hornbill),मलबारी करडा धनेश (Malabar Grey Hornbill) यांचा समावेश आहे. तसेच दुर्मिळ पांढऱ्या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे येथे आहेत. या पक्षांबरोबर आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल (Yellow footed green-pigeon) देखील सर्वत्र आढळतो. सिस्केप संस्थेचे गिधाड संवर्धन काम येथे प्रभावीपणे सुरू आहे.

देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी

हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. अमुर ससाना याबरोबरच ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर, ठिपकेवाली तुतारी, काळया डोक्याचे भारीट, तिबोटी खंड्या, फ्लेमिंगो व हिमालयन बुलबुल व इतरही देशी व विदेशी प्रवाशी व स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील विविध भागात दाखल होतात. विशेष म्हणजे औद्योगिकी कारणामध्ये देखील येथील जैवविविधता टिकून आहे. असे राम मुंढे म्हणाले.

जिल्ह्यात जवळपास 29 प्रकारचे पक्षी पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ मलबारी व राखी धनेश, निलगिरी रानपारवा, करड्या डोक्याची मैना, पांढऱ्या गालाचा कुटूरगा आदी. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल तर त्याचे संवर्धन व जतन करण्याची गरज आहे.

-प्रवीण कवळे, प्रसिद्ध पक्षी निरीक्षक

पश्चिम घाट निसर्ग व जैवविविधतेने जिल्हा नटलेले आहे. शिवाय कंदळवने समृद्ध आहेत. त्यामुळे येथे देशी विदेशी पक्षांना अनुकूल अधिवास मिळत आहे. याबरोबरच वनविभाग तसेच निसर्गप्रेमी संस्था, पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्यामुळे पक्षांचा अमूल्य ठेवा टिकून आहे.

-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT