Ganesh Festival Sakal
कोकण

रायगडमध्ये उंच गणेश मूर्तींना पसंती

राज्य सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा शिथिल केली असल्याने रायगड जिल्ह्यात पाच फुटांपासून सुमारे १३ फूट उंचीच्या गणेशमूर्तींना प्रचंड मागणी वाढली आहे.

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा शिथिल केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पाच फुटांपासून सुमारे १३ फूट उंचीच्या गणेशमूर्तींना प्रचंड मागणी वाढली आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींसाठी आगाऊ नोंदणी झाली आहे. मुंबई-ठाण्यातूनही उंच मूर्तींना मागणी आहे. मात्र, मूर्तींचा पुरवठा करताना मूर्तिकारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दोन वर्षे खासगी गणेशमूर्तींसाठी दोन आणि सार्वजनिक बाप्पासाठी चार फूट उंचीची मर्यादा ठेवण्यात आली होती. यंदा उंचीची मर्यादा हटवण्यात आली आहे. अधिक उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेश मंडळांना करता येणार आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे ११ दिवस शिल्लक आहेत. अधिक उंचीच्या वेगवेगळ्या आकारांच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील काही मूर्तीशाळांमध्ये अधिक उंचीच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी साचा नाही. त्यामुळे साचा तयार करण्यापासून मूर्ती तयार करण्यापर्यंत जास्‍त कालावधी लागण्याची शक्यता आहे. मागणी अधिक व पुरवठा कमी अशी परिस्थिती मूर्तिकारांसमोर आहे. रात्रीचा दिवस करून ते कामाला लागले आहेत. तयार मूर्तींच्या सजावटीचीही लगबग सुरू आहे.

फायबरचा साचा

पेण गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. जोहे आणि हमरापूरमध्ये अधिक उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्‍यासाठी फायबरच्या साचाचा उपयोग केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT