Irshalwadi landslide Sakal
कोकण

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दत्ता लवांडे

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत या घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.

"ही अतिशय दुर्दैवी घटना घडली असून गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. या गावातील ४८ कुटुंबांमध्ये २२८ जण राहत होते. तर मातीखाली अडकलेल्या ८० जणांना बचावपथकाच्या जवानांनी वाचवलं आहे. जेसीबी जात नसल्यामुळे दोन ते अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का असा विचार प्रशासन करत आहे."

"तर मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी असून ते वेगवेगळ्या एजन्सीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर दादा भुसे, उदय सामंत, स्थानिक आमदार तिथे उपस्थित असून ते नातेवाईकांना आधार देत आहेत. सध्या तरी अडकलेल्या लोकांना वाचवणं हेच मुख्य काम आहे." असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बचाव पथकातील एका जवानाचा मृत्यू

बचावकार्य सुरू असताना पथकातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. शिवराम ढुमणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इतर सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र वाटेतच ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT