bajari  sakal
कोकण

Raigad : पक्ष्यांसाठी बाजरीची शेती; भिवघर येथील पक्षीप्रेमी शेतकऱ्याचा उपक्रम

महाड तालुक्यातील भिवघर हे गाव वनप्रेमींचे गाव म्हणून ओळखले जाते.

सकाळ वृत्तसेवा

महाड - आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकविण्यासाठी जिथे शेतकऱ्याला मोठा संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये निसर्गरम्य भिवघर गावातील एका पक्षिप्रेमी शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी आपल्या शेतामध्ये बाजरी लावली आहे. या बाजरीचे कणसाचे दाणे खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे या गावांमध्ये लोटत आहे.

महाड तालुक्यातील भिवघर हे गाव वनप्रेमींचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील तरुण किशोर पवार यांनी वनप्रेमी संस्थेच्या माध्यमातून पक्षिप्रेमी व ग्रामस्थांना एकत्रित करत वणवा मुक्तीची चळवळ गावामध्ये यशस्वी केल्याने या गावातील वनसंपदा वणवामुक्त झाली आहे. गावातील वृक्ष तोड थांबल्याने जंगलाची वाढ होऊ लागली आहे.

त्यामुळे गावामध्ये जंगलातील विविध प्राणी, पशू-पक्षी तसेच जैवविविधतेचे दर्शन घडत आहे. उन्हाळ्यामध्ये या पशू-पक्ष्यांना पिण्याचे पाणी कमी पडू नये, याकरिता दानशूर व्यक्तींमार्फत टँकरच्या माध्यमातून जंगलामध्ये पशू-पक्ष्यांना पाण्याची सोय केली जाते.

गावातील आदिवासी समाज या चळवळीमध्ये सहभागी झाला आहे. या निसर्ग चळवळीमुळे गावातील अनेक व्यक्ती वनप्रेमी संघटनेशी जोडल्या जात आहेत. अशाच प्रकारे या गावातील पक्षिप्रेमी नरेश बाबाजी गुडेकर यांनी डोंगरातील भागामध्ये वीस गुंठे क्षेत्रामध्ये पक्ष्यांसाठी बाजरीचे पीक घेतले आहे. जंगलातील पक्षी व पाखरे भात पिकापेक्षा ज्वारी-बाजरीच्या पिकावर अधिक प्रमाणात येत असतात.

त्यामुळे त्यांनी बाजरीचे वेगळे पीक घेण्याचा निर्णय घेतला. खास पक्ष्यांसाठी त्यांनी बाजरीची कणसे मोकळी सोडली आहेत. नरेश यांनी आपले संपूर्ण शेत पक्ष्यांसाठी खुले केले आहे. बाजरीच्या कणसांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यांच्या शेतात येत आहेत. यातून जे काही पीक शिल्लक राहील ते उत्पादन आपल्यासाठी घेणार आहे. नरेश यांच्या या कृतीचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

गावामध्ये आम्ही अनेक वर्षे वणवामुक्तीचे व जंगल रक्षणाचे काम करत आहोत. आम्हाला आमचे भिवघर गाव निसर्ग पर्यटन केंद्र करायचे आहे. आमच्या चळवळीत असे शेतकरी व वनप्रेमी यांचा नेहमीच सहभाग असतो, त्यामुळेच आम्ही ही चळवळ यशस्वी करू शकलो.

किशोर पवार, अध्यक्ष, वनप्रेमी संस्था

आपल्यासाठी शेती करत असतानाच पशू-पक्ष्यांच्या देखील अन्नधान्याची सोय करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. यातूनच पशू-पक्ष्यांची संख्या वाढून पर्यावरणाचे रक्षण होऊ शकेल.

नरेश गुडेकर, स्थानिक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT