Raigad Rain Update Sakal
कोकण

Raigad Rain Update : रायगडमध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची लगबग; आतापर्यंत २६ टक्के पूर्ण

पडणारा पाऊस भातपिकासाठी पोषक असल्याने येथील शेतकऱ्यांनी लावणीची लगबग सुरू

सकाळ वृत्तसेवा

Alibaug Monsoon Update : मागील २४ तासांत रायगडमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे रखडलेल्या भातलावणीच्या कामांना वेग आला. पडणारा पाऊस भातपिकासाठी पोषक असल्याने येथील शेतकऱ्यांनी लावणीची लगबग सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत २६ टक्के भातलावणी झाली आहे.

मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने लावणीची कामे रखडली होती. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक भातलावणीचे प्रमाण पोलादपूर, सुधागड, कर्जत, खालापूर या तालुक्यांमध्ये आहे. तर सर्वांत कमी प्रमाण अलिबाग, पेण, मुरूड, माणगाव तालुक्यात आहे. दरम्यान, रविवार दुपारपासून पडणाऱ्या पावसाने भातलावणीच्या कामांना वेग आला आहे.

लावणी लावण्यात कुटुंबीय व्यग्र

पोलादपूर : पावसाची रिपरिप सुरू असल्याने दोन दिवसांपासून पोलादपूर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये लावणीला सुरुवात झाली आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने सर्व कुटुंबीय शेतीच्या कामात हातभार लावत आहेत. पाऊस समाधानकारक पडत असल्याने शेतकरीही आनंदीत झाले आहेत.

भातलावणीची कामे रखडली होती. सध्या पडणाऱ्या पावसाने खलाटीमध्ये लावणीसाठी बऱ्यापैकी पाणी जमा झालेले आहे. काही शेतकऱ्यांनी भातलावणी आधीच करून घेतल्याने मजूर उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने लावणीची कामे आटोपती घेत आहोत.

- शांताराम पाटील, प्रगतशील शेतकरी, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT