railway engine run on konkan railway on electricity test successful in ratnagiri 
कोकण

कोकण रेल्वे वीजेच्या इंजिनवर धावणार; जूनपर्यंत गाडी रुळावर येण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील प्रतीक्षेत असलेल्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रोहा ते रत्नागिरी या २०३ किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाची इलेक्‍ट्रक लोकोची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. सकाळी साडेनऊला रोहा येथून सुटलेली गाडी दुपारी साडेतीनला रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली.

कोकण रेल्वेमार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. त्यानंतर रत्नागिरी ते रोहा २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये प्रारंभ झाला. कोरोनातील टाळेबंदीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास हे काम युद्धपातळीवर सुरूच होते. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल, पूल येथून वीजवाहिन्या, वीज खांब उभारले आहेत.

वाहिन्यांमधून विजेचा पुरवठा विनाअडथळा सुरू होतो की नाही, हे पाहण्यासाठी २२ फेब्रुवारीपासून करंट सोडण्याची चाचणी घेण्यात आली. या भागात विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या धावण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त इन्स्पेक्‍शन लवकरच होणार आहे. याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणाऱ्या इंजिनच्या चाचण्या रोहा ते रत्नागिरी सुरू झाल्या आहेत. याचा एक भाग म्हणून आज सकाळी विजेवरील इंजिन चालविण्यात आले. सकाळी रोहा येथून साडेनऊला सोडलेले इलेक्‍ट्रिक इंजिन करंजाडीपर्यंत चालविण्यात आले. तेथून ते पुढे रत्नागिरी स्थानकात साडेचारला दाखल झाले.

रत्नागिरीतील प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी या पाच जणांचे पथक रोहा येथून विजेवरील इंजिन घेऊन निघाले. रत्नागिरीतून एक इंजिन चिपळूण ते खेड करंजाडीपर्यंत सोडून चाचणी घेण्यात आली. नियमित रेल्वे धावत असल्याने विजेवरील इंजिनला थांबा द्यावा लागत होता. सकाळी साडेनऊला सुटलेले हे इंजिन टप्प्याटप्प्याने साडेचारला रत्नागिरी स्थानकात दाखल झाले.

विजेवरील इंजिन चालविण्याची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्याने कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या प्रकारच्या चाचण्या कायम सुरू ठेवण्यात येणार आहेत. जूनपूर्वी या मार्गावर विजेवर गाडी चालविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कोकण रेल्वेचा विद्युतीकरणापर्यंतचा प्रवास

  •  ऑक्‍टोबर १९९० मध्ये रेल्वेमार्गाचे काम सुरू
  •  सप्टेंबर १९९५ मध्ये पहिली रेल्वे खेडात
  •  नोव्हेंबर १९९६ मध्ये रत्नागिरीत प्रवेश
  •  जानेवारी १९९७ मध्ये सावंतवाडीत
  •  रत्नागिरीतील विद्युतीकरण २०१८ मध्ये सुरू
  •  फेब्रुवारी २०२१ मध्ये पहिली चाचणी

"कोकण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणामुळे इंधनावरील खर्चाची बचत होणार असून, प्रदूषण कमी होईल. तसेच, गाड्यांचा वेग वाढेल आणि देखभालीच्या खर्चातही घट होईल."

- ॲड. विलास पाटणे, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT