rain alert in ratnagiri 
कोकण

चक्री वाऱ्याच्या स्थितीमुळे पुढील तीन तासांत रत्नागिरीत अवकाळी पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - चक्री वाऱ्याच्या स्थितीमुळे पुढील तीन तासांत अवकाळी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली असून, यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. बुधवारी (ता. 17) दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. आभाळ भरून आले. रत्नागिरीत पावसाने "घुमट' केले होते. फेब्रुवारीनंतर आता पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. बुरशीजन्य रोगांचा हल्ला आंब्यावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

जानेवारी, फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत ठराविक अंतराने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला. त्यानंतर गेले काही दिवस तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंतवर गेले होते. दिवसभर उष्माचा तडाखा बसत होता. रात्रीही किमान पारा 24 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. वातावरणातील या बदलांमुळे मध्य प्रदेशच्या आग्नेयसह महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याची तीव्रता वाढून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गुरुवारी, शुक्रवारी राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

अवकाळी पावसाला अनुसरून रत्नागिरीत स्थिती आहे. बुधवारी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आभाळही भरून आले होते. त्यामुळे पाऊस पडणार अशीच अटकळ होती; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा शिडकावा झाला नाही. हवेत उष्णता वाढलेली होती. हवामान विभागाने 21 मार्चला विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडेल, अशी शक्‍यता वर्तविली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा बागांवर होण्याची दाट शक्‍यता आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे फळधारणा, मोहोर आणि कैरी अशा तीन स्थितीत आंबा आहे. पाऊस पडला आणि उष्मा वाढला, तर आंबा तयार होईल. मोहोर, कणीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होईल. या परिस्थितीत कैरी गळून जाण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी पावसात आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच आज चिपळुणात पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या होत्या. आंबा पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला. बुधवारी सायंकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस पडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. 
 
गणपतीपुळेसह आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून आभाळ भरून आलेले होते. या वातावरणामुळे तुडतुडा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि फळ गळ होईल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणीचा हात वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीत बागायतदारांसाठी चिंता वाढली आहे. 
- डॉ. विवेक भिडे, बागायतदार 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT