rain atmosphere in konkan sindhudurg dangerous to crop in sindhudurg 
कोकण

कोकणात अवकाळीचा जोर ; आंबा, काजू बागायती संकटात

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. 5 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहिले आहे. गेल्या पाच दिवसांत 13.72 एवढ्या सरासरीने पाऊस झाला आहे. एकूण 109.8 मिलिमीटर एवढा पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. सर्वाधिक पाऊस दोडामार्ग सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात पडल्याची नोंद आहे. 

पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी मध्यम व मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस दोडामार्ग, सावंतवाडी या दोन तालुक्‍यांत म्हणजेच जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात झाला. तर वेंगुर्लेमध्ये 19.8 मिलिमीटर झाला. त्यामुळे या तालुक्‍यांतील आंबा व काजू फळ पिके संकटात सापडली आहेत. बदलते हवामान परिस्थितीत आंबा व काजू पिकांची काळजी घेण्याचे आवाहन वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

सध्या काजू व आंबा पिकांना फळधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. या वातावरणामुळे मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जी फळधारणा झाली आहे, अशा फळांवर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कार्बेन्डझिम 50 टक्के किंवा थायोफीनेट 70 टक्के यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक एक लिटर पाण्यात एक ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

ढगाळ वातावरणात तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. आज सकाळच्या सुमारास काहीसे ढगाळ व काहीसे निरभ्र वातावरण दिसून आले; मात्र बागायतदारांची चिंता काही कमी झालेली दिसून येत नाही. 

आतापर्यंतचा पाऊस मि.मीमध्ये 

दोडामार्ग 37, सावंतवाडी 23, वेंगुर्ले 19.8, कुडाळ 10, मालवण 10, कणकवली 2, देवगड 3, वैभववाडी 5, एकूण 109.8, सरासरी 13.72.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT