rain flowing after ratnagiri mirya pandhramad shore is in danger 
कोकण

कोकणात पावसाचा जोर वाढला : हा बंधारा गेला वाहून ; ग्रामस्थांच्या उरात भरली धडकी...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे ढासळत चाललेला मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा वाहून गेला असून नारळाचे झाडही पाण्यात गायब झाले आहे. पावसाचा जोर वाढत असून किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. 


 किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले. सोमवारी दुपारच्या सुमारास समुद्राला भरती आली आली होती. आज सकाळपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उधाणाच्या लाटांचा जोरही वाढलेला आहे. अजस्त्र लाटा किनाऱ्या वरील भागात फुटत आहेत. उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा मिऱ्या किनारपट्टीला बसला. मिऱ्या येथील पंधरामाड धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला उधाणाच्या भरतीचा तडाखा बसला आहे. येथील मोरेवाडी येथे राहणाऱ्या सावंत यांच्या बागेचे नुकसान झाले आहे  या परिसरातील बंधारा वाहून गेला असून किनाऱ्यावरील एक नारळाच झाड लाटांच्या माऱ्याने पडलं आहे. दुसरं झाडही पडण्याची शक्यता आहे.

लाटांचे पाणी घराच्या परिसरात येऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. उधाणाच्या लाटांनी धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड समुद्राने गिळंकृत केले असून बंधाऱयाला मोठे भगदाड पडलं आहे  पावसाचा जोर कायम राहिला तर या भागाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 
 दरम्यान,  किनारपट्टी भागातील काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे, जयगड आदी भागात किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने काही प्रमाणात रहिवासी भागात प्रवेश केल्याने ग्रामस्थांच्या उरात धडकी भरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

SCROLL FOR NEXT