rain
rain sakal
कोकण

Sindhudurg : पावसाच्या लहरीचा संमिश्र प्रभाव

संतोष कुळकर्णी

देवगड : यंदा भरपूर पाऊस कोसळण्याचा सुरुवातीचा अंदाज असताना आता परतीचा प्रवास सुरू झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे; मात्र मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचे आंबा हंगामावर संमिश्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पाऊस जाऊन कडाक्याची थंडी पडल्यास आंबा कलमे लवकर मोहोरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे लवकर पाऊस गेल्याने उन्हाळी हंगामात पाणी टंचाईचे सावट भेडसावू शकते, असेही चित्र आहे.

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाली. साधारणतः जूनच्या मध्यानंतर मॉन्सूनचे आगमन झाले. त्यामुळे १ जूनपासून मासेमारी बंद झाली असली तरी पाऊस लांबल्याने मच्छीमारांच्या दृष्टीने त्याचा लाभ झाला नाही. यंदा शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाला असला तरीही अखेरच्या टप्यात त्याने काहीशी ओढ दिल्याने शेती सुकण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते; मात्र गणपती सणानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतीला पोषक झाले. आता कडक ऊन पडत असून शेती कापणीयोग्य झाली आहे. कातळावरील भातशेती कापणीला सुरुवात झाली आहे. यंदा तुलनेत पावसाचे प्रमाण कमीच राहिले. आता तर परतीच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्यामुळे पाऊस जाण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात केवळ २६०२ मिलीमीटर इतकीच पावसाची नोंद झाली आहे. आता कडक ऊनाच्या झळा बसत आहेत. आता पाऊस गेल्यास त्याचे बरे-वाईट पडसाद दिसतील. बागायतदारांच्या मते पाऊस लवकर जाऊन कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी पडल्यास आंबा कलमे लवकर मोहोरण्यास सुरुवात होईल. तसे झाल्यास आंबा हंगामाची वेळेआधी चाहूल लागू शकते. सध्याच्या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी फुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाल्यास झाडांना आलेली पालवी जुन होऊन मोहोर येण्यास विलंब लागू शकतो, असाही मतप्रवाह आहे.

पाऊस गेल्यानंतर काही दिवसांतच थंडीची चाहूल लागते. सध्या किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळी हवेतील गारवा वाढला आहे. बोचरी थंडी काही प्रमाणात जाणवत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्यावेळी कडक थंडी आंबा हंगामासाठी पोषक मानली जाते. एकीकडे आंबा कलमांना पालवी आल्यास आलेली पालवी टिकवण्यासाठी, किडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आणि मोहोर आल्यास मोहोरातून निर्धोक फलधारणा होण्यासाठी तातडीने बागायतदारांच्या फवारण्या सुरू होतात. अशावेळी फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. काहीजण या काळात पाणी विकतही घेतात. लवकर मोहोर येऊन फवारणीने वेग घेतल्यास आंबा हंगामाला वेळेआधी सुरूवात होऊ शकते. त्यामुळे पावसाच्या पुढील प्रवासावर सारे अवलंबून आहे.

मागील पाच वर्षांचा विचार करता यंदा पावसाचे प्रमाण कमीच आहे. उशिरापर्यंत पाऊस राहिल्यास पाणी साठवण क्षमता वाढून पुढे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असते. आता लगेच पाऊस जावून कडक ऊन लागल्यास नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी होऊ लागतील. पर्यायाने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट होऊन ऐन उन्हाही हंगामात पाणी टंचाई डोकेवर काढण्याची शक्यता अधिक आहे. येथील देवगड जामसंडे शहरास नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो; मात्र पावसाचे प्रमाण पुढे नसल्यास नदीतील पाणी पातळीत घट होऊन टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडील पाच वर्षाचा विचार करता २०२० मध्ये सुमारे ४०७५ मिलीमीटर तर गतवर्षी सुमारे ३४९९ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळी हंगामात टंचाईची तीव्रता भासली नव्हती. यंदा पावसाचे प्रमाण अजूनही कमीच आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यास भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची प्राथमिक शक्यता आहे. यंदा भरपूर पाऊस होण्याचा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र पाऊस झालाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT