Rains have resumed in Kolhapur district today due to low pressure belt formed in the Arabian Sea 
कोकण

कोल्हापुरात पावसाची पुन्हा एंट्री : दोन दिवस रिपरिप सुरुच राहणार 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर  : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अरबी समुद्रातील बदलत्या हवामानामुळे आजपासून येत्या दोन दिवसांत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत संकपाळ यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. आज सकाळी तुरळक सूर्यदर्शन वगळता हवामान ढगाळ आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 


गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती तर ऑक्‍टोबर हीट सप्टेंबरमध्येच जाणवत होती मात्र आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. सकाळी नऊच्या सुमारास अर्धा तास झालेल्या सूर्य दर्शनानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. यामुळे शासकीय कार्यालयासह इतर ठिकाणी नोकरीवर जाणाऱ्यांना आज रेनकोट घ्यावाच लागला. 

गत वर्षीसह या वर्षीही कोल्हापुरात महापुराचा फटका बसल्याने पावसाची रिपरिप सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकरांची चिंता काही प्रमाणात वाढली.  डोंगराळ भागात जोराचा पाऊस सुरू होता तर शहर आणि परिसरात सुद्धा पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. फेरीवाल्यांचीही धांदल उडाल्याने काही प्रमाणात विक्री बंद झाली. तर काहींनी प्लास्टिक पेपर झाकत फळे व भाजीपाल्याची विक्री सुरू केली मात्र त्यांना अपेक्षित ग्राहक रस्त्यावर दिसत नव्हते. एकंदरीतच थांबलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात करून व्यावसायिक, फेरीवाले आणि शेतकऱ्यांची ही चिंता काही प्रमाणात वाढविली आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT