rainy atmosphere effects on mango crop in konkan area 
कोकण

कोकणात आंबा बागायतदारांची चिंता वाढली; ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. बुधवारी घुमट केले असले तरीही पावसाचा जेमतेम शिडकावाच झाला; परंतु दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण कायम होते. २२ मार्चला पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाची टांगती तलवार आंबा बागायतदारांवर कायम आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात गुरुवारी  (१८) पहाटेच्या सुमारास हलका पाऊस झाला.

मुंबईतील हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २२ मार्चला काही ठिकाणी विजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. जनतेने सुरक्षितता बाळगावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. आभाळ भरुन आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्‍यता होती. सायंकाळी हलका वाराही होता. दिवसभर उकाडा जाणवत होता. पारा ३५ अंशापर्यंत वर गेल्यामुळे उन्हाचा तडाखा रत्नागिरीकरांना चांगलाच बसला. दुपारच्या सुमारास अनेकांनी कार्यालयात, घरात राहणे पसंत केले. रात्रीच्या सुमारासही उष्मा जाणवत होता. त्यामुळे पुढील दोन दिवसात पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संगमेश्‍वरमध्ये पाऊस झाला होता. 

आंबा बागायतदारांची चलबिचल 

रणरणत्या उन्हामुळे आंबा बागायतदारांची चलबिचल सुरु आहे. उन्हाचा कडाका वाढला की पावसाचे आगमन निश्‍चित असते. आंबा झाडावरच लवकर तयार होऊ लागला आहे. फळगळीचा त्रासही अनेक ठिकाणी जाणवत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT