कोकण

'आजच्या शिवसैनिकांची मला कीव येते, त्यांच्यात हिंमतच नाही'

तुषार सावंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा अडविण्याच्या घोषणा शिवसेनेकडून करण्यात आल्‍या.

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची जन आशीर्वाद यात्रा (jan aashirvad yatra) अडविण्याच्या घोषणा शिवसेनेकडून करण्यात आल्‍या; पण प्रत्‍यक्षात एकही शिवसैनिक (shivsena) अथवा त्‍यांचा पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवू शकला नाही. आजच्या शिवसैनिकांची मला कीव येतेय, अशी टीका भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली (rajan teli) यांनी आज केली.

येथील भाजप संपर्क कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ‘‘जन आशीर्वाद यात्रेवेळी केवळ दिखाव्यापुरताच शिवसेनेकडून विरोध झाला; पण समोर येण्याचे धाडस कुणी करू शकले नाहीत. आमच्या वेळची शिवसेना आणि शिवसैनिक वेगळे होते. कुणा मंत्र्याची गाडी अडवायची असा इशारा देऊन थांबत नव्हते. तर प्रत्‍यक्षात कृती करून दाखवत होते. आमच्यावेळी देखील पोलिस बंदोबस्त होता. काँग्रेसचे (congress) सरकार सत्तेवर होते; पण आम्‍ही आंदोलने करून दाखवली आहेत.’’

पुढे तेली म्‍हणाले, ‘‘शिवसेनेच्या आमदारांनीही केवळ इशारा दिला. रस्त्यावर येण्याचे धाडस ते देखील दाखवू शकले नाहीत. त्‍यामुळे आताची शिवसेना काय आहे हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. किंबहुना आताच्या शिवसैनिकांचे वर्ग घेण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्‍या जन आशीर्वाद यात्रेवेळी काही शिवसैनिक केवळ राणेंसाहेबांना पाहण्यासाठी आले होते. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला संपूर्ण कोकणातून उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक देखील राणेंचे स्वागत करण्यासाठी पुढे आले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच ही यात्रा यशस्वी होऊ शकली, असे तेली म्‍हणाले.

केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये

एकीकडे भाजपमध्ये येण्यासाठी चर्चा करायची. देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरून मनधरणी करायची आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायची. आमदार केसरकर (deepak kesarkar) यांनी संघर्षाची भाषा करू नये. हजारो कोटींच्या उद्योगांबाबतही बोलू नये. मंत्री असताना त्‍यांना रोजगार देणारा एकही उद्योग उभारता आला नाही. आता ते दोन हजार कोटींचे अम्युझमेंट पार्क उभे करण्याच्या वल्गना करत असल्‍याचे तेली म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT