rajan teli criticized on maharashtra government 
कोकण

`शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सरकार राजकारण आणत आहे`

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - राज्यातील सर्व ओजस शाळा बंद करून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही ठाकरे सरकार राजकारण आणत आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. तसेच ज्या शिवसैनिकांच्या पाठबळावर खासदार झाले, त्याच शिवसैनिकांना चपलेने मारा म्हणणार्‍या विनायक राऊतांचा निषेधही त्यांनी केला. 

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत तेली बोलत होते. यावेळी सुदन बांदिवडेकर, जयदेव कदम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. तेली म्हणाले, “आंतरराष्ट्रीय शाळांच्या धर्तीवर राज्यातही फडणवीस सरकारने ओजस शाळा सुरू केल्या. त्याला मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चराठे येथील शाळेला तर ग्रामस्थांनी 80 गुंठे जागा मोफत दिली; मात्र ठाकरे सरकारने ओजस शाळाच बंद करण्याचा आडमुठेपणा केला आहे. कोकणातून शिवसेनेने सर्वाधिक आमदार खासदार निवडून दिले; पण शिवसेनेला कोकणाचा विकास करता आला नाही.  येथील गावे ओस पडायची वेळ आली. त्यामुळे रोजगार निर्माण करणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला; मात्र खासदार राऊत याच शिवसैनिकांना चपलेने मारा असे आदेश देतात, हे चुकीचे आहे. राऊतांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. 

शिवसैनिकांच्या आंदोलनाला पाठिंबा

जिल्ह्यातील नांदगाव-देवगड या राज्यमार्गाची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. ठाकरे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याने खुद्द शिवसैनिकच आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे राजन तेली म्हणाले


बक्षिसालाही स्थगिती

केंद्राने बक्षीस रूपाने दिलेल्या निधीवर देखील ठाकरे सरकारने स्थगिती आणली आहे. वेंगुर्ले नगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये क्रमांक आल्याने केंद्र सरकारने या पालिकेला सव्वा सहा कोटींचा निधी बक्षीस रूपाने दिला. मात्र या निधीतील कामे करू नयेत असे निर्देश ठाकरे सरकारने वेंगुर्ले पालिकेला दिले असल्याचे तेली म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT