कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय
कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय  sakal
कोकण

राजापूर : कातळ परिसरात नव्या फूलवनस्पतीचा शोध

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर: कोकणातील जांभ्या खडकाच्या पठारावर आढळणाऱ्‍या विविध नव्या जागतिकस्तरीय फूलवनस्पतींचा यापूर्वी शोध लागला आहे. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कातळ परिसरामध्ये आढळणाऱ्‍या कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय फुलवनस्पतीच्या ‘श्रीरंगिया’ या नवीन गणाचा आणि ‘श्रीरंगिया कोंकनेन्सिस’ या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चार वर्षाच्या संशोधनानंतर हा शोध लागला आहे. या नवीन गणाचे काही प्रमाणातील बाह्यरंग हिमालयातील चामाईसीअम या गणाशी साधर्म्य दाखवते. परंतु, बाह्यरंगाचे गुणधर्म हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती संशोधक प्रा. डॉ. अरुण चांदोरे यांनी दिली.

रयत शिक्षणसंस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखडा आणि आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरुडे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्टस् अँड आर. वाय. के. सायन्स कॉलेजमधील वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी आणि विद्यार्थी नीलेश माधव यांनी फूलवनस्पतीच्या नव्या गणाचा शोध लावला आहे. तालुक्यातील आबासाहेब मराठे विद्यालयाच्या परिसरातून नव्या फूलवनस्पतीचा शोध लागला आहे. या संशोधनामध्ये त्यांना नाशिक येथील आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वरमधील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद कांबळे, डॉ. कांची गांधी, वरिष्ठ नामांकन रजिस्ट्रार, हार्वर्ड युनिव्हर्सिटी हर्बेरिया आणि लायब्रर, केंब्रिज यांच्यासह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळ यांचे सहकार्य लाभले.

शंभर वर्षांत पहिल्यांदा शोधल्याचा दावा

गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातील नव्या फूलवनस्पतींचा शोध लागला असला तरी, अलीकडच्या सुमारे शंभर वर्षामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा फूलवनस्पतीच्या नव्या गणाचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. नव्या फूलवनस्पतीच्या गणाचा आणि प्रजातीचा शोधनिबंध स्विडन येथील जागतिकस्तरीय जर्नल नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी यामधून काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला आहे.

असे झाले नामकरण

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावावरून फूलवनस्पतीच्या नव्या गणाला ''श्रीरंगीया'' हे नाव देण्यात आले आहे. तर, ही वनस्पती कोकणामध्ये आढळत असल्याने तिच्या प्रजातीला ''श्रीरंगिया कोंकनेन्सिस'' हे नाव देण्यात आले आहे.

नव्या वनस्पतीची वैशिष्ट्ये

  • कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय वनस्पती

  • पांढऱ्‍या रंगाची छोटी फुले

  • लंबगोलाकार आणि लहान फळे

  • नव्या गणाचे बोटॅनिकल नाव ः श्रीरंगिया

  • नव्या प्रजातीचे बोटॅनिकल नाव ः श्रीरंगिया कोंकनेन्सिस

  • उंची ः साधारणतः एक फूट

  • फळांत २ प्रकारच्या ग्रंथी, २ प्रकारच्या शिरा

  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कातळावर झुडपाखाली

  • जून ते जुलै फुले व फळे येण्याचा कालावधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

Bomb Threat: बेंगळुरुमधील नामांकित 3 हॉटेल्स हाय अलर्टवर; बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी

Latest Marathi News Update: मुंबई कस्टम्सने 11.40 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केल्या जप्त

Salman khan Firing: जेलमध्ये जीवन संपवलेल्या अनुजचा पोस्टमार्टम अहवाल अपुरा? राज्य सरकारवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

PM Modi Temple: असे मंदिर जिथे सकाळ-संध्याकाळ होते पंतप्रधान मोदींची पूजा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

SCROLL FOR NEXT