नव्याने मोहोर तरी शेतकरी चिंतातूर sakal
कोकण

राजापूर : नव्याने मोहोर तरी शेतकरी चिंतातूर

राजापूर तालुक्यातील चित्र; मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार, कॅनिंगसाठी पाठवणे शक्य

सकाळ वृत्तसेवा

राजापूर: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल झालेले बदल यामुळे अनेक आंबा बागांमध्ये फळधारणा झालेली नाही. काही झाडांवरील मोहोर काळा पडला तर, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये अनेक बागांमध्ये कैरी गळून नुकसान झाले. त्यामुळे आंबा बागायतदार आणि शेतकरी चिंताग्रस्त असताना नव्याने आंब्याला मोहोर येऊ लागल्याने त्यांच्या चेहऱ्‍यावर प्रश्नचिन्ह दिसत आहे.

सध्या मोहोरलेल्या झाडांना हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार आहे. त्या आंब्या पेट्या मार्केटमध्ये पाठवून समाधानकारक भाव मिळणे मुश्कील असले तरी, कॅनिंगसाठी पाठवणे शक्य होणार आहे. त्यामुळे खते, औषध फवारणी आदींसाठी केलेला किमान खर्च त्यातून भागण्याची शक्यता आहे.

यावर्षी मोहोर येण्याच्या कालावधीमध्ये असलेल्या प्रतिकूल हवामानाने आंबा हंगामाला चांगलाच तडाखा बसला. त्यातून, आंबा झाडांना अपेक्षित असलेला मोहोर आलेला नाही. थंडीचे कमी प्रमाण, ढगाळ वातावरण अशा स्थितीतही काही झाडांना मोहोर आला. मात्र, प्रतिकूल परिणाम होऊन तोही काळा पडून गळून गेला आहे. याच्यातून यावर्षी आंब्याचा हंगाम गतवर्षीच्या तुलनेमध्ये घटल्याचे चित्र दिसत आहे. त्याच्यातून खतासाठी केलेला खर्च, विविध औषध फवारणी आणि देखभाल यासाठी केलेला खर्च भागेल, एवढे उत्पन्न मिळेल की नाही, याबाबत शेतकरी साशंक दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT