गंगास्नानाची पर्वणी! sakal
कोकण

राजापूर : लाखाहून अधिकांनी साधली गंगास्नानाची पर्वणी!

मॉन्सूनमध्येही भाविकांची गर्दी; उन्हाळे तीर्थक्षेत्री सर्व कुंडात मुबलक पाणी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : मे महिन्यामध्ये दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पवित्र गंगामाईचे आगमन झाले. मॉन्सूनला सुरूवात झाल्यानंतरही गंगामाई मुबलक प्रमाणात प्रवाहीत असून मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. भर पावसाळ्यामध्येही पवित्र गंगास्नासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक उन्हाळे तीर्थक्षेत्री गर्दी करत असून आगमनानंतर सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र गंगास्नानाची पर्वणी साधल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्यादृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यातील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. मात्र, कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक भाविकांनी गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधारण अडीच-तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्गमन झाले होते. त्यानंतर, ७५ दिवसानंतर गत महिन्यामध्ये पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. मे महिन्यामध्ये गंगामाईने आगमनाने साऱ्‍यांना सुखद धक्का दिला.

आगमनानंतर आजपर्यंत उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाई सर्व कुंडामधून मुबलक प्रमाणात वाहत असून वास्तवाचा तीन महिन्यांचा कालावधी गंगामाई यावेळी पूर्ण करणार का ? याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.

दरदिवशी हजारोंची उलाढाल

गंगामाईच्या आगमनानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. मान्सूनला सुरूवात झाली असली तरी, त्या ठिकाणी ही दुकाने सुरू आहेत.

गंगास्नानासाठी भाविकांची संख्या वाढत असल्याने त्याचा फायदा या दुकानदार वा व्यवसायिकांना होताना दरदिवशी या ठिकाणी हजारो रूपयांची उलाढाल होत असल्याची माहिती एका व्यावसायिकाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT