Rajapur property seal  sakal
कोकण

राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी

प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; हरकतींसाठी २७ जूनपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना निश्‍चित झाली आहे. असताना प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ८ हजार १०५ मतदारांचा समावेश आहे. या मतदार यांद्यावर २७ जूनपर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत.

नगरपालिकेची मुदत संपली असून, कोरोना महामारीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा ज्वर कमी झालेला असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. प्रभाग रचना निश्‍चित झाली असून, प्रभागनिहाय आरक्षण सोडतही झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याचे संकेत मिळत असताना आता प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.

या प्रारूप मतदार यादीवर २७ पर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत. हरकतींवर प्रशासकीय सुनावणी होऊन त्या निकालात काढून मतदार यादीला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर होताच ती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांची पावले नगरपालिकेकडे वळली आहेत.

पाच वर्षांपूर्वी राजापूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ७ हजार ५११ मतदारसंख्या होती. त्यामध्ये ३ हजार ६९१ पुरुष, तर ३ हजार ८२० एवढी महिला मतदारांची संख्या होती. पाच वर्षांनंतर या मतदारसंख्येमध्ये ५९४ मतदारांची वाढ झाली आहे.

काय आहे आरक्षण

येथील पालिकेची आगामी निवडणूक दहा प्रभागांतील वीस जागांसाठी होणार आहे. त्याची आरक्षण सोडत झाली असून, त्यामध्ये वीसपैकी दहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने त्या ठिकाणी पुरुष वा महिला यापैकी कोणालाही निवडणूक लढविता येणार आहे. वीसपैकी केवळ एक जागा अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित आहे. उर्वरित एकोणीस जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: सावकाराच्या ताब्यातील शेती मूळ शेतकऱ्यास केली परत

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT