Fasting 
कोकण

राजापूर : प्रकल्प वेगात; ग्रामस्थ अंधारात

काजिर्डावासीय संतप्त; आजपासून प्रकल्पस्थळी उपोषण छेडण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

राजापूर: स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असतानाही तालुक्यातील काजिर्डा येथील जामदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता सुरू असलेले धरणाचे काम, रखडलेले पुनर्वसन, प्रशासन आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आता काजिर्डा ग्रामस्थांनी दंड थोपटले असून रविवारपासून (ता. ६) प्रकल्पस्थळी Fasting छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

काजिर्डाचे माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, प्रदीप चंदुरकर, गणेश गुरव, मनोहर राणे आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार व पोलिस ठाण्याला आंदोलनबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील काजिर्डा येथे जामदा प्रकल्पाच्या उभारणीची दोन दशकांपूर्वी मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प कायमच वादाच्या भोवऱ्‍यात सापडलेला आहे. विविध मागण्यांच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाच्या उभारणीला विरोध केला होता. अनेकवेळा धरणाचे काम बंदही झाले होते. त्यानंतर या धरणाची निविदा राज्याच्या सिंचन घोटाळ्यामध्ये संशयाच्या भोवऱ्‍यात सापडली होती. त्यामध्ये शासनाच्यावतीने चौकशी होऊन काही धरणांच्या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये या धरणाच्याही निविदेचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रदीर्घ काळ धरणाचे काम थांबविण्यात आले. आता नव्याने कामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे.

स्थानिक ग्रामस्थ वा ग्रामपंचायत यांना विश्‍वासात न घेता धरणाचे काम सुरू आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे आधी ५० टक्के पुनर्वसन करायचे असूनही नियम धाब्यावर बसवून काम चालू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करणार, धरणग्रस्तांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार, पुनर्वसनाचा अद्यापही आराखडा तयार नाही. त्याबाबत धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त करताना त्या विरोधात ग्रामस्थ रविवारपासून (ता. ६) प्रकल्पस्थळी उपोषण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT