Rajapur property seal  sakal
कोकण

राजापूर : दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सीलची नोटीस

थकीत करप्रश्‍नी राजापूर पालिका झाली आक्रमक

इंगोले भागवत

राजापूर : मालमत्ता कर थकीत असलेल्या दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सील करण्याची अंतिम नोटीस राजापूर पालिका प्रशासनाने बजावली आहे. ५५ हून अधिक नळसंयोजनांचा पाणीपुरवठा बंद केला. कोरोनाच्या महामारीत विकासकामांसाठी निधी देण्यात शासनाकडून हात आखडता घेतल्याने आधीच पालिकेची तिजोरी रिती राहिलेली आहे. अशा स्थितीत विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची उभारणी करण्यासाठी हक्काचा स्रोत असलेली कर आकारणी भरणा करण्याकडे करदात्यांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत सीलची कारवाई करण्यात आली.कोरोनाच्या महामारीमध्ये गतवर्षीची थकित राहिलेली कराची रक्कम आणि यावर्षीची कररक्कम अशा कर रक्कमेची पालिकेकडून वसुली केली जात आहे. त्यात तीन हजार ४३६ मालमत्ताधारकांकडून एक कोटी २० लाख ९२ हजार ७३५ रुपयांची मालमत्ता कर आकारणी केली जात आहे.

त्यापैकी शासकीय येणे वगळता ७८ लाख ७७ हजार १६ रुपयांची म्हणजे ६५.१४ टक्के वसुली झाली आहे. तर, सुमारे दोन हजार ५५६ नळ संयोजनधारकांकडून ४० लाख ५५ हजार ५४४ रुपयांची पाणीपट्टी करवसुली केली जाणार आहे. त्यापैकी शासकीय येणे वगळता ३० लाख २४ हजार ३७० रुपये म्हणजे ७४.५७ टक्के वसुली झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे विकासकामासाठी देण्यात निधीबाबत शासनाने हात आखडते घेतले आहेत.

शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने पालिकेला विकासकामे करण्यासाठी विविध कररूपात गोळा होणाऱ्‍या स्वनिधीवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा स्थितीत कराच्या थकित रक्कमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाने मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये मालमत्ता कर थकीत असलेल्या एकाच सदनिकेतील दहा फ्लॅटधारकांना मालमत्ता सीलची अंतिम नोटीस बजावली आहे.

दृष्टिक्षेपात करवसुली

कराचे स्वरूप करदाते मागणी वसुली टक्केवारी

मालमत्ता कर ३,४३६ १,२०,९२,७३५ ७८,७७,०१६ ६५.१४

पाणीपट्टी कर २,५५६ ४०,५५,५४४ ३०,२४,३७० ७४.५७

नागरिकांनी पालिकेकडे विविध प्रकारच्या भरलेल्या करांच्या रकमेचा शहर विकासासाठी विनियोग करण्यात येतो. त्यामुळे मालमत्ता आणि पाणीपट्टीची थकीत कर असलेल्या करदात्यांनी वेळीच कर रक्कम भरणा करून पालिकेला सहकार्य करावे.

- प्रशांत भोसले, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT