Rajdhani Express bound for Madgaon arrives at Ratnagiri 
कोकण

मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरीत दाखल ; पण निर्माण झाले प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - विविध राज्यात जाण्याकरिता केंद्राने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस आज रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली.

केंद्र शासनाने विविध राज्यात थेट जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे दिल्ली ते मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस आज रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली.या गाडीला रत्नागिरी स्थानकावर तांत्रिक कारणाकरिता काही मिनिटांचा थांबा होता असे समजते. त्या वेळी रत्नागिरी स्थानकात ३०० ते ४०० लोकं उतरल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

उतरलेल्या लोकांचा मात्र रितसर अर्ज भरून माहिती व तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
या प्रवाशांनी मडगावपर्यंत तिकीट काढून रत्नागिरीत उतरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.उद्याही एक ट्रेन नवी दिल्ली येथून मडगावला जाणार आहे.या ट्रेनला रत्नागिरी स्थानकात अधिकृत थांबा आहे का? थांबा नसेल तर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पँसेजर रत्नागिरीला उतरलेच कसे. रेल्वे प्रशासनाला याची कल्पना होती काय, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होवू लागले आहेत. दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलीस व आरोग्य यंत्रणा दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

अर्थबोध : शेअर बाजाराची ऐतिहासिक घसरण काय सांगते?

Pune MPSC Protest: आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम; आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही नेत्यांची रीघ, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT