Rajan Pratishthan for Social Distance in Mandangad kokan marathi news 
कोकण

मंडणगडात ते 24 जण बनले कोविड १९ चे स्वयंसेवक....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड शहरात तीन दिवसांपासून सोशल डिस्टन्सचा अभाव दिसून आल्याने नागरिकांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणारे शहरातील राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावले असून शहरात सोशल डिस्टन्ससाठी कार्यरत झाले आहेत. त्यांना नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने कोविड १९ स्वयंसेवक म्हणून नाव दिले आहे.

गेल्या ३-४ दिवसांपासून मंडणगड शहरात नागरीकांची वर्दळ खूपच वाढली. शहरात लोक मास्कविना फिरत असल्याचे निदर्शनात येत होते. दुकानासमोर सोशल डिस्टन्स पाळतच नाहीत असे चित्र दिसू लागले होते. यावर मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शहरातील बाजारपेठेत दिवसभर फिरून अभ्यास केला असता, अनेक धक्कादायक माहिती समोर आली.

मंडणगडात सोशल डिस्टन्ससाठी राजे प्रतिष्ठान सरसावले​

मंडणगड शहरात सध्या गर्दी करणारे लोक शहरातील नसून मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक शहरात धाव घेत आहेत. सध्या शहरात गर्दी करणारे लोक कापडी मास्क वापरत नाहीत कारण ते ग्रामीण भागातील असल्याने एकतर त्यांना मास्क उपलब्ध होत नाहीत. घ्यायला परवडत नाहीत व स्थानिक प्रशासनाने त्यांना दिले नाहीत. तसेच सोशल डिस्टन्स पाळत नाहीत कारण त्यांना सोशल डिस्टन्स ही कन्सेप्ट माहिती नाही. त्यामुळे मंडणगड नगरपंचायत प्रशासन या नवीनच उद्भवलेल्या समस्येकडे गांभीर्याने पाहत त्यावर उपाययोजना म्हणून स्वयंसेवक नेमण्याचे ठरविले.

मुख्याधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद​

त्याला राजे प्रतिष्ठान या संस्थेने प्रतिसाद देत आपले २४ तरुण कार्यकर्ते दिले आहेत. त्यांना नगरपंचायत कार्यालयात संतोष माळी यांनी नागरिकांना करावयाच्या सूचना व घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कोविड १९ स्वयंसेवक कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील दुकानासमोर होणारी गर्दी नियंत्रणात आली असून नागरिकांना सोशल डिस्टन्सचे महत्व पटू लागले आहे. तसेच हे स्वयंसेवक नागरिकांना हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासाठी प्रवृत्त करीत असल्याने आरोग्याची काळजी घेतली जाते आहे.

२४ युवक स्वयंस्फूर्तीने कार्यरत..

राजे प्रतिष्ठान मंडणगडचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी २४ युवक मदतीसाठी दिले. हे युवक कोरोना आपत्तीच्या काळात नगरपंचायत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. त्यांना नगरपंचायत प्रशासनाने " COVID 19 स्वयंसेवक " या नावाने ओळखपत्रे दिली आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ह्या स्वयंसेवकांच्या मदतीने आपण नवीन उभ्या ठाकलेल्या समस्येवर सुद्धा मात करू असा विश्वास आहे.
- संतोष माळी, मुख्याधिकारी नगरपंचायत मंडणगड.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT