रत्नागिरी : महाराष्ट्र आणि कोकणला विकासात्मक ताकद देणारा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याला ५३० कोटींचा निधी मिळाला आहे. एवढेच नव्हे तर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क’साठी ३०० कोटींची तरतूद केली असून ५० कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात सायन्स टेक्नॉलॉजीसाठी विद्यार्थ्यांना पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
झूम ॲपद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणला या अर्थसंकल्पात झुकते माप दिले आहे. रेवस-रेड्डी या सागरी महामार्गासाठी साडेनऊ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला गती मिळणार असून पर्यटनवाढीला मोठी संधी मिळणार आहे. क्रूझ टर्मिनलसाठी १०० कोटीची तरतूद आहे. यामुळे पर्यटनासाठी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या ५०० पर्यटकांच्या क्रुझला रत्नागिरीत थांबा मिळणार आहे. ते एक किंवा दोन तास रत्नागिरीत फिरतील आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघतील. यातून रत्नागिरीत मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल. धूतपापेश्वर मंदिर विकासासाठी १०० कोटी, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी, कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी ५ कोटी रुपये, सिंधुरत्न समृद्धी योजनेतून ३०० कोटी तरतूद केली आहे.
हेही वाचा - रत्नागिरी मेडिकल कॉलेज ही काळ्या दगडावरची रेघ -
जिल्हा नियोजन विकास आराखडा २११ कोटीचा होता, तो आता २५० कोटीचा झाला आहे. सिंचनासाठी सुमारे ५३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये नाणीज गावात ९२ कोटीचा लघु पाटबंधारे प्रकल्प बांधला जाणार आहे. यातून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच रस्त्यांसाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मनोरुग्णालयातील सेवासुविधा, स्त्री-पुरुष कक्ष बांधण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी ३ कोटी ७० लाख रुपये मिळाले आहेत.
पुणे, हैदराबादकडे जावे लागणार नाही
राजीव गांधी तंत्रज्ञान पार्कसाठी ३०० कोटीची तरतूद केली आहे. त्यापैकी ५० कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहेत. सायन्स टेक्नॉलॉजीसाठी विद्यार्थ्यांना पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जावे लागत होते. या पार्कमध्ये सर्व अभ्यासक्रम चालणार आहेत.
मिऱ्या बंधाऱ्याला १८९ कोटी ६७ लाख
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला १८९ कोटी ६७ लाख तरतूद केली असून २० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघासह ५३० कोटीचा निधी मंजूर झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.