Rapid test machine will also arrive in Sindhudurg on Tuesday 
कोकण

सिंधुदुर्गात रॅपिड टेस्ट मशिनही मंगळवारी येणार 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : कोविड 19 संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करणाऱ्या लॅबला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पुढील 20 ते 25 दिवसांत यंत्रणा कार्यान्वित होईल. तसेच मंगळवारी (ता. 2) रॅपिड टेस्ट मशिन जिल्ह्यात दाखल होईल. त्याच्या चाचण्या देखील सुरू होतील, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या उपस्थितीत श्री. नाईक म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात कोरोना स्वॅब नमुने तपासणी लॅबचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी 29 मे रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील संशयित रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल तातडीने उपलब्ध होणार आहेत.'' 

ते म्हणाले, ""सिंधुदुर्गात कोरोना चाचणी लॅब व्हावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लॅबला मंजुरी दिली. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील रेणवीय प्रयोगशाळा इमारतीमध्ये यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. येत्या 20 ते 25 दिवसांत चाचण्या सुरू होतील. तोपर्यंत जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या रॅपिड टेस्ट घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीची यंत्रसामग्री 2 जूनला सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. कोरोना संशयितांच्या रॅपिड चाचण्यांसाठी जिल्ह्यात लॅब टेक्‍निशियन ट्रेनर देखील येत आहेत. त्यामुळे आता कोविड लॅबवरून सुरू असलेले राजकारण थांबायला हवे. कोविड तपासणीसाठी 80 टक्के यंत्रसामग्री सज्ज आहे. उर्वरित आवश्‍यक यंत्रसामग्री खरेदी करण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. एम्स नागपूर व मुंबई महापालिका या ठिकाणी या मशिनची ऑर्डर दिली जाणार आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT