कणकवली शहर sakal
कोकण

Raratnagiri : कणकवली शहर आणि तालुक्‍याच्या सर्व भागांत आज दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

नद्या, नाले प्रवाहित; ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्‍याने वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहर आणि तालुक्‍याच्या सर्व भागांत आज दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. आजच्या पावसामुळे ठिकठिकाणच्या मार्गावर वृक्ष कोसळल्‍याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्‍यान, दोन दिवस पाऊस झाल्याने कोरडे पडलेले नद्या, नाले पुन्हा प्रवाहित झाले आहेत.

शहरातील कॉलेज रोडवर आज दुपारी दीडच्या सुमारास झाडा कोसळले. ही बाब समजताच नगरपंचायतीच्या पथकासह, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सुमारे तारासभरात कॉलेजरोडवरील झाड हटविण्यात आले. या कामी नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, मिथून ठाणेकर, भरत उबाळे आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

दुपारी अडीचच्या सुमारास कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे येथे झाड कोसळून हा मार्ग ठप्प झाला होता. स्थानिकांनी मेहनत घेऊन साडेतीनला रस्त्यावरील झाड हटवले. त्‍यानंतर कणकवली कनेडी मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. देवगड-निपाण राज्‍य मार्गावर हडपीड येथेही फांदी कोसळून वाहतूक ठप्प झाली. याच दरम्‍यान त्‍या भागातून जाणारे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजकुमार सर्वगोड आणि इतर अभियंते तसेच सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरील अडथळे दूर केले. कणकवली आचरा मार्गावरही दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्‍याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी चारनंतर वाहतूक पूवर्वत झाली.

वीजपुरवठा काही काळ ठप्प

दरम्‍यान, वीज तारांवरही झाडाच्या फांद्या कोसळल्‍याने तालुक्‍यातील अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र महावितरणच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सायंकाळी सातपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले. सलग दुसऱ्या दिवशी कणकवली शहर परिसरात संततधार पाऊस सुरू असल्‍याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT