Chameleon Lizard esakal
कोकण

Chameleon lizard : आफ्रिकेत दिसणारा शॅमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा आढळला रत्नागिरीतील कनकाडीत!

शॅमेलियन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समजला जातो.

सकाळ डिजिटल टीम

हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा, रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सरडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो.

साखरपा : कनकाडी येथे शॅमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा (Chameleon lizard) आढळून आला आहे. बातमीदार अमित पंडित यांना दाभोळे-कनकाडी रस्त्यावर हा सरडा दिसला. तीन वर्षांपूर्वी हा सरडा कनकाडीतच काजूच्या बागेत आढळून आला होता.

पंडित रविवारी या रस्त्याने प्रवास करत असताना हा सरडा त्यांना रस्त्यावर चालताना दिसून आला. शॅमेलियन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समजला जातो. आफ्रिकेत (Africa) आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो.

हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा, रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सरडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढऱ्‍या काट्यांची ओळ दिसून येते. या सरड्याची हालचाल अत्यंत संथ असते. त्यांनी रस्त्यावरची वाहतूक थांबवून सरड्याला रस्त्याकडेला घेऊन रानात सोडून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT