ratnagiri 2 thousand 624 extra beds in Covid Center covid 19 health marathi news
ratnagiri 2 thousand 624 extra beds in Covid Center covid 19 health marathi news 
कोकण

Healthcare Ready: ''रत्नागिरीत शिल्लक बेडची संख्या घ्या जाणून

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने 2 हजार 624 बेड (खाटा) तयार ठेवले आहेत. संपूर्ण आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. होम आयसोलेशनध्ये असलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा अंदाज आहे. यामुळे त्या सर्वांना कोविड सेंटरमध्ये हलवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवरही अधिक भर दिला जात आहे. परंतु जिल्ह्यात अजूनतरी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची आवश्‍यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

कोरोनासंदर्भात पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. ही बैठक ऑनलाइन झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. या वेळी खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते. 

 सामंत म्हणाले, "जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 12 हजार 20 आहे. मयत 388 असून मृत्यूदर 3.23 आहे. ऍक्‍टिव्ह रुग्ण 789 आहेत. होम क्वारंटाईन 568 तर होम आयसेलेशनमध्ये 349 आहेत. 52 रुग्ण ऑक्‍सिजनवर तर 6 व्हेंटिलेटरवर आहेत. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग केलेल्यांची संख्या 1 लाख 30 हजार 571 आहे तर 145 कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्ह्यात कोरोना लस मर्यादित आहे. नियमित लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. मला यात राजकारण आणायचे नाही; मात्र केंद्र शासन महाराष्ट्राला लस देण्याबाबत दुजाभाव करीत आहे. 99 हजार 36 जणांना लस दिली आहे.

दुसरा डोस देण्यासाठीही कमी लस आहे. उद्यापर्यंत लस आली नाही तर लसीकरणाची मोहीम थांबवावी लागेल, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी लस वाया जाण्याचे प्रमाण 12 टक्के होते; मात्र आरोग्य विभागाने सुधारणा करून आता फक्त 3 टक्केच लस वाया जाते. हे रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे चांगले काम आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात बेड वाढविण्यात आले आहेत. यामध्ये विना ऑक्‍सिजन, ऑक्‍सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठाही 10 ते 12 दिवसांपर्यंत पोहोचेल एवढा आहे.'' 

फिजिशियन मिळेना...! 
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, नर्सेस आदींची कमतरता आहे; मात्र आम्ही थेट भरतीचाही प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यानुसार काही नर्सेसची भरती करण्यात आली आहे. 8 बीएमएस डॉक्‍टर मिळाले आहेत; मात्र फिजिशियन डॉक्‍टर मिळावेत यासाठी 1 लाखाचे पॅकेज असलेली जाहिरात काढली होती. परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. खासगी डॉक्‍टरांशी चर्चा करून ती कमतरता भरून काढू, असे सामंत म्हणाले. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT