drone survey google
कोकण

रत्नागिरी : ५१६ गावांचे होणार ड्रोन सर्वेक्षण

भूमी अभिलेख विभागाचा आराखडा; तारखांची प्रतीक्षा, होणार वेळेची बचत

राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५१६ गावांचे भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यात पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करून गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक तालुक्यातील गावे निश्चित केली आहेत; मात्र मंडणगड, दापोली तालुक्यात सर्वांत जास्त गावे आहेत. शासनाकडून ड्रोन कॅमेरा मागितला असून भूमी अभिलेख विभाग आता तारखांच्या प्रतीक्षेत आहे.

महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५१६ गावांचा समावेश असून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने त्यावर काम केले असून जिल्ह्यातील या गावांची निवड केली आहे. समुद्रसपाटीपासून गावाची उंची व ठिकाण तसेच अन्य अनुषंगिक मुद्द्यांच्या आधारे तपासणी झाल्यानंतर ड्रोन कॅमेरा सर्वेक्षणासाठी गावांची निवड केली आहे.

वाढते शहरीकरण व यांत्रिकीकरणामुळे नापीक व वर्षानुवर्षे पडीक जमिनी लागवडीखाली आल्याने बांधाचे व हद्दीचे वाद तसेच हिस्सा यांचे वाद निर्माण होऊ लागले आहेत. हे वाद उपलब्ध अभिलेखांच्या आधारे सोडवण्याचे प्रयत्न भूमी अभिलेख विभागाद्वारे करते. पण यासाठी अधिक सूक्ष्म अभिलेख मिळण्यासाठी आता सर्वेक्षण केले जाणार आहे. परंतु, भूमी अभिलेख विभागाचे काम पूर्वी जुन्याच पद्धतीने होत असल्याने त्याला खूप वेळ लागतो. शिवाय मनुष्यबळ जास्त, खर्चही अधिक होतो. सध्याच्या मोजणी पद्धतीमध्ये विविध भागांचे नकाशे व दस्तावेज सोबत घ्यावे लागतात. हे काम सुरू असताना नागरिक व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांमध्ये वादही होतात. आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणामुळे वेळेची बचत होऊन जमीन मोजणी कार्यक्रमात सुसूत्रता आणि अचूकता येणार असल्याचे भूमी अभिलेखच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भूमी अभिलेख विभागाने ही माहिती दिली.

गावागावातील वाद कमी होण्यास मदत

ड्रोन सर्वेक्षणाच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय कामाचे नियोजन आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ही माहिती दिली जाणार आहे. गावात दवंडीद्वारे ड्रोन सर्वेक्षणासंदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. गावातील नद्या, ओढे, नाले, रस्त्याचे चित्रीकरण व सर्वेक्षण करून मोजणी केली जाणार आहे. नद्यानाल्यांची, रस्त्याची जागा ठरवून दिली जाणार आहे. यामुळे गावातील वाद कमी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT