एसटी संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब
एसटी संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब sakal
कोकण

रत्नागिरी : खेड एसटी संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब

सिद्धेश परशेट्ये

खेड: सुमारे पाच महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बाजारपेठेतील सर्वच घटकांना बसला असून घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच कामगार व व्यापारी यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेले पाच महिने सुरू असलेल्या संपामुळे मालवाहतुकीसाठी व्यापाऱ्‍यांना अन्य वाहतूकदारांचा पर्याय नाईलाजास्तव स्वीकारावा लागला.

बाजारपेठेमध्ये व्यापारी किरकोळ व घाऊक अशा दोन प्रकारामध्ये विभागला जातो. स्थानिक पातळीवर घाऊक व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्‍यांना कोकणाबाहेरील वस्तू व शेतमाल उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातील कच्चा माल अथवा तयार वस्तू विक्रीसाठी ने-आण करताना राज्य परिवहन महामंडळाचे जाळे सोपे व किफायतशीर वाहतूक साधन व्यापाऱ्‍यांसाठी ठरत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या बाजारपेठेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्‍यांना खासगी मालवाहतुकीचा महागडा पर्याय स्वीकारताना अधिकचे नुकसान सोसावे लागत आहे. खायची पाने, फुले, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी दुग्धजन्य पदार्थ, वर्तमानपत्र स्थानिक पातळीपर्यंत एसटीने पोहचवण्यात येत होती. घाऊक व किरकोळ विक्रेते त्यांची विक्री करून अार्थाजन करत होते. परंतू, त्यांना मिळणाऱ्‍या नफ्यामध्ये वाहतुकीचा खर्च वाढल्याने या व्यापाऱ्‍यांचे आर्थिक घडी कोलमडली आहे. वृत्तपत्र व्यावसायिक विक्रेते ग्रामीण भागात बस फेऱ्‍या पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे केवळ शहर व उपनगरांमध्येच वृत्तपत्र विक्री करून आपला चरितार्थ चालवत आहेत.

कोकणात शेतीचे मर्यादित क्षेत्र आहे. त्यातही भाजीपाला लागवड करणारे शेतकरी संपूर्ण तालुक्यात अत्यल्प संख्येत आहेत. अशा शेतकऱ्‍यांना ग्रामीण भागातून स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा भाजीपाला, फळभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येताना खासगी वाहनाने ये -जा करावयास लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दड सोसावा लागत आहे. हा सारा खर्च हा न परवडणाराच आहे. व्यापाऱ्‍यांकडे अनेक लोक ग्रामीण भागातून नोकरीसाठी ये -जा करत होते. परंतु संपामुळे त्यांना ये -जा करण्यासाठी कमी खर्चाचे असलेले साधन बंद झाल्याने अल्पमजुरीत आपल्या कुटुंबांचा रहाटगाडा हाकावा लागत आहे.

नोकरांची संख्या कमी

व्यापाऱ्‍यांनाही दुकानांमधून नोकरांची संख्या कमी करावी लागली आहे. कामगारांना शहरात ये-जा करण्यासाठी खासगी वाहनासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे नोकरवर्ग मालकांकडे अधिक मजुरीची मागणी करीत आहे. ते परवडण्याजोगे नसल्यामुळे कामगार व मालकांमधील दरी वाढत आहे. कोरोनाचा कहर ओसरल्यानंतर बाजारपेठेतील व्यापारी आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करीत असताना एसटीचा संप सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत.

एसटी संपाचा फटका पार्सल विभागाला मोठ्या प्रमाणात बसला असून संपामुळे गेले पाच महिने पार्सल विभाग बंदच आहे. ग्रामीण भागातील बसचे जाळे उत्तम असल्यामुळे पार्सल सुविधेसाठी बसचा वापर फायदेशीर असतो. संपामुळे पार्सल सुविधा बंद असल्यामुळे गेले अनेक दिवस आमचा व्यवसाय बंद आहे.

-शैलेश जुवळे, व्यवस्थापक, पार्सल कार्यालय

बंदमुळे हे झाले..

* खासगी वाहतूकीचा पर्याय महाग

* कामगारांच्या जाण्या, येण्यावर परिणाम

* काहींवर नोकरी सोडण्याची आली वेळ

* व्यापाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT