kokan sakal
कोकण

रत्नागिरी : निर्जीव दगडात रंग भरणारी कलाकार

पेंटिंगमधून आखली स्वत:ची वेगळी वाट

अमित पंडित

साखरपा : ना रितसर शिक्षण ना कोणती पदवी; पण अंगभूत कलेला याचा कशाचाही अडथळा येत नाही हे रत्नागिरीतील युवा कलाकार श्वेता केळकर यांनी दाखवून दिले आहे. युवा चित्रकार म्हणून त्या पुढे येत आहेत. त्यांची आणखी एक काहीशी वेगळी आवड म्हणजे स्टोन पेंटिंग. वेगवेगळ्या आकारातील दगड जमवून त्यांवर चित्रे रेखाटण्याचा त्यांचा छंद आहे. निर्जीव दगडात रंग भरणाऱ्या कलाकार, अशी त्यांची ख्याती आहे.

श्वेता या व्यवसायाने स्थापत्यविद्या पदवीधर आहेत. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील विद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. असं असलं तरी त्यांची मूळ आवड चित्रकलेची आहे. निर्जीव दगडात रंग भरण्याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘कोणत्याही दगडावर चित्र रंगवता येत नाही. नदीत किंवा समुद्रात राहून एक बाजू गुळगुळीत झालेला दगड घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे चित्राशी सुसंगत, असा त्याचा आकारही असावा लागतो. दगड हे कागद किंवा कॅन्व्हासच्या तुलनेत बरेच लहान असल्यामुळे त्यावर चित्र रंगवताना खूप जागरूक राहावं लागतं, त्याचबरोबर चित्र तयार झाल्यावर त्याला वॉर्निश लावल्यास ते चित्र धूळ व पाण्यापासून सुरक्षित राहात.’ त्यांनी स्टोन पेंटिंग करताना काढलेला गणपतीपुळ्याचा गणेश आणि मांजराची काही चित्रं रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.

शाळेत असताना चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या तेवढ्याच. त्यानंतर त्यांनी कोणतेही रितसर शिक्षण घेतलं नाही; पण कला मात्र जोपासत राहिल्या. आधी जलरंगात सुरवात करून मग पोस्टर कलर, अक्रालिक रंग आणि तैलरंगात काम सुरू केलं. निसर्ग चितारायला त्यांना खूप आवडतं. तशीच आणखी एक आवड म्हणजे समुद्र चितारण्याची. असंख्य निसर्गचित्रे त्यांनी आजपर्यंत रेखाटली आहेत. गणपतीपुळे येथील गणेशमंदिर, आंबाघाटातील वळणे ही चित्रे विशेष आकर्षक ठरली आहेत. या सगळ्या आवडीत चित्रकार रवींद्र मुळे यांचं विशेष मार्गदर्शन मिळत असल्याचं त्यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात

* स्थापत्यविद्या पदवीधर, तोच व्यवसाय

* छंद म्हणून चित्रकलेची जोपासना

* जलरंग, पोस्टर कलर, ऑइल पेंटिंग

* स्टोन पेंटिंगमध्ये वेगळे काम

* थिबा पॅलेस महोत्सवात 17 चित्रे प्रदर्शित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT