मचाळ परिसर हा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होऊ शकते. दुसऱ्या छायाचित्रात मुचकुंदी नदीचा परिसर हा पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हायला वाव आहे sakal
कोकण

रत्नागिरी : सर्व क्षेत्रात मागासलेला; विकासासाठी आसुसलेला लांजा तालुका

मोठी बाजारपेठ तालुक्यात जवळजवळ नाहीच

रवींद्र साळवी

लांजा: सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला लांजा हा दुर्गम तालुका. मुचकुंदी ऋषींची गुहा, मुचकुंदी, नावेरी, काजळी या सह्याद्रीच्या माथ्यावरून वाहणाऱ्या नद्या, माचाळसारखे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ठरावा, असा श्रीमती जानकीबाई (अक्का) तेंडुलकर महिलाश्रम, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण तालुक्यात मोठे शहरीकरण अद्यापही झालेले नाही. लांजा शहर वगळता, मोठी बाजारपेठ तालुक्यात जवळजवळ नाहीच. औद्योगीकरणाचा कोणताही मागमूस या तालुक्यात नसल्याने सर्वच बाजूंनी होणारा विकास खुंटलेला आहे. पारंपरिक शिक्षणसुविधाच उपलब्ध आहेत. सक्षम राजकीय नेतृत्वअभावी राजकीय पाठबळाची या तालुक्याला कायमची उणीव राहिली आहे.

तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहराची लोकसंख्या वाढली असून शहराचा विस्तार झाला आहे. लांजाचा काही अंशी झालेला केवळ परिवर्तनीय विकास हा मुंबई-गोवा महामार्गामुळेच झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील ही एकमेव मोठी बाजारपेठ असल्याने तालुकावासीय लांजा शहराच्या नेहमी संपर्कात असतात.स्थानिक आमदार नाही...

शासनाच्या अनेक सोयीसुविधा व महत्त्वाकांक्षी योजनांपासून लांजा तालुका दूरच राहिला आहे. या तालुक्याला आतापर्यंत स्थानिक आमदार मिळालेला नसल्याने हा तालुका विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिलेला आहे. राजकीय नेतृत्वाअभावी तालुक्यात फारसे उद्योग-व्यवसाय नाहीत. प्रत्येकवेळी स्थानिक उमेदवारीची मागणी करण्यात आली; मात्र ती दुर्लक्षित राहिली.

पाणीटंचाई वाढण्याची शक्यता

तालुक्यात सात लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आहेत. यातील काही धरण प्रकल्प नादुरुस्त बनल्याने यांचा सद्यःस्थितीत कोणताही उपयोग होत नाही. यामुळे भविष्यात पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस ही पाणीटंचाई तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

लांजा तालुक्याला राजकीयदृष्ट्या सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. त्यामुळे लांजा तालुका विकासाच्यादृष्टीने मागासलेला आहे.

- महेश खामकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT