काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इब्राहीम दलवाई रिंगणात  sakal
कोकण

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई रिंगणात

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेल होऊन ६ उमेदवार बिनविरोधदेखील झाले; मात्र सर्वपक्षीयांची ही भूमिका प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांना पटलेली नाही. त्यामुळे अनेकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई (Ibrahim Dalwai) यांनीही उमेदवारी दाखल करून बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उडी घेतली आहे.

सर्वपक्षीय सहकार पॅनेल बनवताना तडजोडीत काँग्रेसला मिळालेल्या तीन जागा काही पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्याने काँग्रेसमधील इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली. त्यास पक्षाच्या नेत्यांची सहमती असल्याचेही इच्छुकांमधून सांगितले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यानंतर गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणाहून देखील विरोधाचा सूर उमटू लागला. सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये भाजपालाही जागा मिळाल्या आहेत, तरीही माजी खासदार नीलेश राणे यांनी सर्वपक्षीय सहकार पॅनेलविरोधात दंड थोटपले.

सहकार पॅनेलविरोधात असणाऱ्या उमेदवारांना बळ देण्याची त्यांनी घोषणा केली होती. सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये सर्वाधिक १० जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेना, काँग्रेस आणि भाजप अशी स्थिती आहे. यापूर्वी सर्वपक्षीयमध्ये काँग्रेसला ६० जागा मिळाल्या होत्या. आता त्या कमी करून ३ देण्यात आल्या. यामुळे काँग्रेसमधील इच्छुक पदाधिकारी नाराज झालेत. या इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांनी केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे पदाधिकाऱी असलेल्या उमेदवारांकडून सांगण्यात आले.

ईब्राहीम दलवाई हे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी माजी खासदार (कै.) गोविंदराव निकम यांच्यासोबत २००१ ते २००५ दरम्यान जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना सहकारातील कामकाजाचा अनुभव आहे. या वेळी इच्छुक असतानाही संचालकपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी औद्योगिक वाहतूक व्यवसाय, देखरेख उप्तादक संस्था, मच्छीमार सहकार संस्था व अन्य सहकारी संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या गटात एकूण ९४ मतदार आहेत.

राकेश जाधवही..

राष्ट्रवादीतील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मनिषा जाधव यांचे पती राकेश जाधव यांनी मजूर सोसायट्यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीच्या मातब्बर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. सध्यातरी इच्छुकांनी सर्वपक्षीय सहकार पॅनेलविरोधात उमेदवारी दाखल करून दंड थोपटलेच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT