accident
accident sakal
कोकण

चिपळूणमध्ये अपघातात युवती जागीच ठार !

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : महाविद्यालयाच्या शुल्काचे पैसे आणण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरून दळवटणेला जाणाऱ्या दुचाकीला चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चेतक कंपनीच्या डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेली तरुणी जागीच ठार झाली; तर दुचाकीचालक युवती जखमी झाली. श्रुती संतोष शिर्के (वय १८, मूळ भोम, सध्या रा. बेंदरकर आळी, चिपळूण) असे मृत युवतीचे नाव असून, जान्हवी एकनाथ जाधव (१९, रा. दळवटणे- नलावडेवाडी) ही जखमी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी घडला.

मृत्यू झालेल्या श्रुतीला भरपाई मिळावी, यासाठी तिच्या नातेवाईकासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. भरपाई मिळत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईक मंडळीनी घेतली होती. अखेर भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले. डीबीजे वरिष्ठ महाविद्यालय सोमवारपासून सुरु झाले आणि पहिल्याच दिवशी या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला.दिलीप गोविंद यादव ( डेरवण - गुरववाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपरचालकाचे नाव आहे. कोरोनामुळे बंद असणारे डीबीजे महाविद्यालय सुरु झाल्यानंतर श्रृती व जान्हवी या दोघी सकाळी महाविद्यालयात आल्या होत्या.

त्यांचा महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता व त्या दोघीही 13 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेतात. त्या महाविद्यालयात आल्यानंतर यातील जान्हवीची शैक्षणिक फी राहिल्याने त्या दोघी दुचाकीने मुंबई - गोवा महामार्गावरून दळवटणेला जात होत्या. याच महामार्गावरुन परशुरामकडे सुरु असलेल्या चौपदरीकारणाच्या कामासाठी डंपर जात होता. तो शहरातील बहाद्दूरशेख नाक्यावर आला असता दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्या दोघी दुचाकीसह रस्त्यावर पडल्या. जान्हवीला डोक्याला दुखापत झाली , तर दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या श्रुतीच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.जखमी जान्हवीला शहरातील एका खासगी स्त्रणालयात दाखल करण्यात आले आहे.

भरपाईसाठी चेतक कंपनीकडे मागणी

अपघातानंतर चेतक कंपनीचे जनसंपर्क अधिकारी पोलीस स्थानकात आल्यानंतर मृत्यू झालेल्या श्रुतीला भरपाई मिळावी, यासाठी तिच्या नातेवाईकासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. जोवर भरपाई मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईक मंडळीनी घेतली होती. अखेर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी भरपाई देण्याचे मान्य करताच श्रुतीचा मृतदेह कामथे रुग्णालयात विच्छेदनासाठी सायंकाळी ६ वाजता नेण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या श्रुतीच्या पश्चात आई - वडील तसेच भाऊ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT