ratnagiri Collector sent a letter to the government 
कोकण

रत्नागिरीत कोरोनाची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकार्‍यांनी पाठवले शासनाला पत्र....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबईहून कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची व्यवस्था करताना जिल्हाप्रशासनाची तारांबळ उडत आहे. अनेक प्रवासी विनापास, विनापरवानगी येत असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. चाकरमान्यांना पास देताना स्थानिक प्रशासनाला कळवावे असे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडे पाठवले आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. जिल्हाप्रशासनाकडून दरदिवसाच्या नोंदी घेण्याचे काम सुुरु आहे. शनिवारी एका दिवशी नऊ हजार चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यातील काहीजणं विना परवानगी आले आहेत. वाढत्या लोकांमुळे क्वॉरंटाइनची क्षमता संपत आहे. या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे सादर केली आहे.

हजारो चाकरमानी जिल्ह्यात

यापुढे मुंबईतुन कोकणात येण्यासाठी कुणालाही पास देताना जिल्हाप्रशासनाची परवानगी घेेणे अत्यावश्यक करावे. जेेणेकरुन त्यांची व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळणार आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांत हजारोंच्या संख्येने चाकरमानी गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा विचार करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी सुचना करण्यात आली आहे. या पत्राची दखल घेऊन कोणती कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समन्वय साधणे होईल सोपे : सामंत

दरोरोज मुंबईकरांना कोकणात येण्यासाठी दिल्या जाणार्‍या पासची संख्या कमी करावी असे पत्र राज्याच्या पोलिस आयुक्तांना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. स्थानिक आणि चाकरमानी यांच्यासाठी आरोग्य यंत्रणेचा समन्वय आणि ताळमेळ साधणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये विरोध करण्याचा प्रश्‍न येत नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT