कोकण

एका दिवसात 17 जणांचा मृत्यू; रत्नागिरी बाजारपेठेची प्रवेशद्वारे बंद

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : संचारबंदी (Ratnagiri Curfew)असूनही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ सुरूच आहे. पोलिस दलाने काही दिवस कारवाई करण्याचे टाळले होते. मात्र आता शहरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी पोलिस दलाने सुरू केली आहे.

ratnagiri covid died new 17 people covid 19 update marathi news

मुख्य बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी राम आळी, मारूती आळी, पोस्ट ऑफिस आदी बाजरपेठेची सर्व प्रवेशद्वारे बॅरिकेटने बंद केली आहेत. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले आहे. कोरोना फैलाव आणि संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र फैलाव आटोक्यात आणण्यास अजून अपेक्षित यश आलेले नाही. जिल्ह्यात काल(ता.11) पुन्हा 622 नवे कोरोना बाधित सापडले तर एका दिवसात 17 जणांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढविणारे हे आकडे आहेत. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीही लागू केली आहे. मात्र पोलिसांकडुन त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. तशी नाराजीही मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी नऊ तारखेपासून शहरीभागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

रत्नागिरी शहरामध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन दिवसभर बाजारपेठेत गर्दी आणि वाहनांची वर्दळ दिसते. दुकानांचे मुख्य शटर बंद आणि मागच्या दाराने वस्तू विकल्या जात असल्याने ही गर्दी दिसते. ते टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेची सर्व प्रवेशद्वारे पोलिसांन बॅरिकेटने बंद केली आहेत. त्यामुळे विनाकारण आणि अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली बाजारपेठेत फिरणार्‍या दुचाकीस्वारांवर काहीशी बंधने आली आहे. बाजारेपेठेत होणारी गर्दी कमी झाली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यात मदत होणार आहे.

ratnagiri covid died new 17 people covid 19 update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

SCROLL FOR NEXT