Disaster Management esakal
कोकण

रत्नागिरी : धडे आपत्तीचे ; संकेत धोके ओळखण्याचे

सुरक्षेच्या उपायांसह दाखविले प्रात्यक्षिकेही

सकाळ वृत्तसेवा

जुलै २०२१ मध्ये झालेल्या ढगफुटीमुळे खेड, चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यांत पूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते. याची पुनरावृत्ती झाल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी ६ मे रोजी बैठक घेऊन तालुका, जिल्हास्तरावरील आराखडे बनवण्याचे आदेश दिले होते. धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना, लोकवस्तींचे स्थलांतर याबाबत लक्ष दिले जात आहे.

दरडप्रवण भागात साक्षरता अभियान

आपत्ती व्यवस्थापन उपायोजनांमध्ये दरडप्रवण भागात साक्षरता अभियान सुरू आहे. भूगर्भतज्ज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांची चिपळूण, संगमेश्‍वर आणि खेड तालुक्यात व्याख्याने घेतली. दरड कोसळण्यापूर्वी किंवा पूर येण्यापूर्वी निसर्गाकडून संकेत मिळतात. पोसरे येथेही तसे संकेत मिळाले होते. काही लोकांनी आपणहून स्थलांतर करणे पसंत केले होते. पोसरेसारखे प्रकार भविष्यात घडू नयेत, यासाठी दरडप्रवण भागातील तलाठी, पोलिसपाटील, आशा व अंगणवाडी सेविका, सरपंच यांच्यासह प्रशासन आणि प्रमुख लोकप्रतिनिधींना दरड कोसळण्यापूर्वीच्या संकेतांविषयी माहिती दिली जात आहे. तसे आढळल्यास ग्रामस्थांना सतर्क करून सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहे. जिल्ह्यात २११ गावांतील हजारो लोकांना साक्षर बनवले जात आहे.

आपत्तीत मदतीसाठी संस्थांचा पुढाकार

चिपळूणच्या वाशिष्ठीला पूर आला, तेव्हा बोटी शोधण्यापासून काम करावे लागले होते. या वेळी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी तीन सामाजिक संस्थांसह होमगार्ड, पोलिस दलातील प्रतिसाद दलातील लोकांना सज्ज ठेवले आहे.

२०० होमगार्ड राज्य आपत्ती निवारण दलाकडून (एसडीआरएफ) विशेष प्रशिक्षण दिले आहे. ते गावागावातील लोकांना प्रशिक्षण देत आहेत. पूरप्रवण भागातील २५० लोकांना प्रशिक्षित केले गेले आहे. पोलिसांचा आपत्ती दलही सज्ज झाला आहे. गतवर्षी त्यांचे सहकार्य मिळाले होते.

मच्छीमारी बोटींचे सहकार्य

शासनाकडून चिपळूण, खेड, राजापूर नगरपालिका क्षेत्रासाठी १० नवीन बोटी मदतीसाठी दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास मच्छीमारांच्या सुमारे ४५ छोट्या बोटींही आरक्षित करून ठेवण्यात आल्या आहेत. वेळ पडल्यास गुहागर, दापोली, रत्नागिरीतून आवश्यक तेथे बोटी पाठवल्या जाणार आहेत.

* घाट परिसरात यंत्रणा सज्ज

राष्ट्रीय महामार्गांवरील घाट परिसरात दरड कोसळून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये आंबाघाटासाठी साखरपा येथे पोकलेनसह आवश्यक मशिन्स ठेवली आहेत. उर्वरित घाटांमध्ये भोस्ते, परशुराम, कुंभार्ली, निवळीचा समावेश आहे.

* धरण परिसरातही सुरक्षा

जिल्ह्यात सुमारे ७४ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. पावसाळ्यात ही धरणे भरून धोका निर्माण होतो. लोकांच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी प्रत्येक धरणावर एक सुरक्षारक्षक ठेवला जाणार आहे. तसेच जी धरणे धोकादायक आहेत ती रिकामी ठेवण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. अर्लटसाठी धरणाखालील गावांमध्ये भोंगे लावले जाणार आहेत.

ढगफुटीसारख्या पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटना वेळीच नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यंदा पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यात २११ दरडप्रवणग्रस्त भाग असून, २०६ गांवे नदी, समुद्र आणि खाडीकिनारी आहेत. यंदा आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज करण्यावर भर दिला आहे. दरड कोसळण्यापूर्वी किंवा पूर येण्यापूर्वी निसर्गाकडून संकेत मिळतात. त्याची जाणीव निर्माण करण्यासाठी दरडप्रवण भागात आपत्ती साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.

- राजेश कळंबटे, रत्नागिरी

दरड प्रवणग्रस्त व किनारी भाग

तालुका दरडग्रस्त गावे किनारी गावे

मंडणगड २ ७

दापोली २४ ३९

खेड ५१ १८

चिपळूण ४८ ५

गुहागर १४ २६

संगमेश्‍वर ३९ १६

रत्नागिरी १७ ५७

लांजा ११ ३

राजापूर ५ ३५

चारशे ठिकाणी अत्याधुनिक भोंगे

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची तीव्रता किंवा माहिती एकाचवेळी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी भोंगे बसवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सुमारे चारशे ठिकाणी अशी यंत्रणा काही महिन्यांत लावण्याबाबत विचार सुरू झाला आहे.

यंत्रणा अशी सज्ज

फायबर, रबरच्या नवीन बोटी १०

पोर्टेबल एलईडी लाईट ४२

रोप अ‍ॅण्ड रेस्क्यूसाठी वस्तूंचे किट ७

जिल्ह्यात बॅग्ज उपलब्ध ५

संपर्क राखण्यासाठी सॅट यंत्रणा १

जिल्ह्यात लाईफ जॅकेट ५७०

लाईफ बोये १४६

पर्जन्यमापक कार्यान्वित १३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT