Ratnagiri District Hospital Suspected corona patient kokan marathi news 
कोकण

तो दुबईतून आला अन् रत्नागिरी रुग्णालयात दाखल झाला...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाचा संशयित रुग्ण आज जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला आहे. विशेष कक्षात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आठ दिवसांपूर्वी संशयित रुग्ण दुबई येथून आला होता. 
सर्दी-खोकला झाल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णाने स्वतः रुग्णालयाशी संपर्क साधला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. शनिवारी (ता. १४) दुपारी दोनच्या सुमारास ‘कोरोना’च्या संशयिताला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष कक्षात उपचारासाठी ठेवलेआहे.

जिल्ह्यात संशयित रुग्णांची संख्या चार

तालुक्‍यातील पूर्णगड येथील रुग्ण आठ दिवसांपूर्वी तो दुबईतून दाखल झाला होता. दुबईतून आल्यानंतर चार दिवसांनी त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास दाखला जाणवू लागला. त्यानंतर त्याने स्वतः जिल्हा रुग्णालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्‍टरांनी तपासणी करुन ॲडमिट केले करुन घेतले. किमान १४ दिवस त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्याचे काही नमुने पुणे येथे पाठविले आहेत. जिल्ह्यात संशयित कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार झाली असून तालुक्‍यात कोरोना संशयितांची संख्या दोन झाली असल्याचे डॉ. बोल्डे यांनी सांगितले.

गर्दी होणारी ठिकाणे बंद

राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पाऊले उचलली आहेत. मॉल, सिनेमागृह, हॉटेल  डी-मार्ट, रिलायन्स मॉल या ठिकाणी डॉ. बोल्डे यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण वाढल्यास गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

 दक्षता व स्वच्छता  गरजेची

प्रत्येकाने दक्षता घ्यावी. खोकताना रुमाल तोंडाशी धरावा. माक्‍सचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, ‘कोरोना’चा जिवाणू जिवंत राहण्याची शक्‍यता जास्त असल्याने स्वच्छता गरजेची आहे.
- डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्य चिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Auction Live: मुंबई इंडियन्सचा अजब डाव! ५.७५पैकी एकाच खेळाडूवर खर्च केले ३ कोटी; कोण आहे ती?

पुण्यातील बँकेत चक्क दर्शनासाठी होतेय भाविकांची गर्दी, 3.5 किलो सोन्याच्या दत्त मूर्तीचं वर्षातून एकदाच दर्शन, 60 वर्षांची परंपरा

Ajit Pawar: ''भाऊ म्हणून बहिणीचं रक्षण करणार'', अजित पवार उज्वला थिटेंवर पहिल्यांदाच बोलले, पाटलांना दिला दम

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील विद्यार्थिनी होणार 'आत्मनिर्भर' जिल्हा प्रशासनाकडून 'वीरांगना' स्व-संरक्षण प्रशिक्षण सुरू

Gond Laddu Recipe: हिवाळ्यासाठी डिंक लाडू बनवताय? मग यंदा ट्राय करा राजस्थानी पद्धतीची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT