ratnagiri district Surgery sanghamitra fule home entry kokan health marathi news
ratnagiri district Surgery sanghamitra fule home entry kokan health marathi news 
कोकण

रत्नागिरीच्या शल्य चिकित्सेची दमदार एंट्री ; अखेर पाच महिन्याच्या नाट्यावर पडला पडदा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शासकीय निवासस्थान मिळण्यावरून सुरू असलेल्या पाच महिन्याच्या नाट्यावर आज पडदा पडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी शासकीय प्रक्रिया करीत तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी निवास्थानाला लावलेले कुलूप जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सर्व यंत्रणेच्या उपस्थितीत फोडले. त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्यावर गृहप्रवेश केला. 


जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे आणि डॉ. संघमित्रा फुले यांच्यात शल्य चिकित्सक पदावरून वाद होता. दोघेही दावा करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर डॉ. बोल्डे यांची सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बदली झाली. 5 ऑक्‍टोबर 2020ला त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. डॉ. फुले जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती झाल्याने शासकीय निवासस्थान त्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु डॉ. बोल्डे यांनी ते सोडलेच नाही.

तीन महिने त्यांनी मुदतवाढ घेतली. दरम्यान, तेथे काही नातेवाईक राहण्यासाठी आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली. त्यानंतरही निवास्थानाला आपले कुलूप लावून ते निघून गेले. निवास्थान मिळविण्यासाठी डॉ. फुले यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. त्याकडे दुर्लक्ष झाले. 
डॉ. फुले यांनी बोल्डे यांचा आडमुठेपणा मोडित काढला. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस यंत्रणा, नायब तहसीलदार, खासगी स्वयंसेवी संस्था, काही अधिकारी, कर्मचारी आदीं लवाजमा घेऊन डॉ. फुले निवास्थानी गेल्या. कुलूप हॅक्‍सॉब्लेडने कापून हातोडीने तोडण्यात आले. आत प्रवेश केला तर आतल्या दरवाजांनाही कुलूप लावले होते. तेही तोडण्यात आले. प्रत्येक वस्तूंचा पंचनामा करण्यात आला. 
 
आठ किमी अंतरावर निवास 
शल्य चिकित्सक रुग्णालयापासून जास्तीत जास्त 3 किमी अंतरावर असणे आवश्‍यक आहे. म्हणून रुग्णालयाच्या जवळ शासकीय निवास्थान आहे. परंतु बोल्डे यांनी शासकीय निवास्थानाला कुलूप लावल्याने डॉ. फुले यांना आठ किमी अंतरावर राहावे लागत होते. 

नियमानुसार माझी नियुक्ती झाल्यानंतर मला शासकीय निवास्थान मिळणे अपेक्षित होते; मात्र डॉ. बोल्डे यांनी कुलूप लावून ठेवले होते. मी कुलूप तोडून शासकीय निवास्थान ताब्यात घेतले. 
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक  


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT