'कॅटने पुकारलेला बंद हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार' 

City merchants in Bharat Bandh federation involved kokan marathi news
City merchants in Bharat Bandh federation involved kokan marathi news

रत्नागिरी : जीएसटीमधील त्रुटींविरोधात शुक्रवारी (ता. 26) कॅटने भारत बंदचे आवाहन केले आहे; मात्र या बंदमध्ये रत्नागिरी शहर व्यापारी संघ सहभागी होणार नाही, अशी माहिती अध्यक्ष उदय पेठे यांनी दिली. व्यापाऱ्यांचा जीएसटीला विरोध आहे, परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे प्रचंड फटका बसल्याने आता बंदमध्ये भाग घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

कॅटच्या बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने चक्का जामची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात देशभरातील सर्व व्यावसायिकांचा जाचक जीएसटी कायद्याला कडाडून विरोध आहे. परंतु व्यापारी महासंघाचा एक दिवसाच्या बंदला पाठिंबा नाही. कोरोना महामारीने व्यावसायिकांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच ही बंदची भर. त्यामुळे व्यापार बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांची मानसिकता नाही. 

महाराष्ट्रातील फार्म या अग्रगण्य संघटनेशी संपर्क साधला असता, त्यांनी या बंदबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच या जाचक जीएसटी कायद्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्‌ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावयाचे ठरविले आहे. तसे करूनही जर सरकारने व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार केला नाही तर देशभरात बंदबाबत धोरण ठरविले जाणार आहे. 

कॅटने पुकारलेला बंद हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. याबाबत सर्व संघटनांना विश्वासात घेणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा जीएसटी कायद्याला विरोध राहील. परंतु बंदबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार चालू ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी केले. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com