ratnagiri Doctors suspected kokan marathi news
ratnagiri Doctors suspected kokan marathi news 
कोकण

मी त्यांना ॲडमिट व्हा म्हणालो,पण त्या स्वतःच क्‍वारंटाईन झाल्या... म्हणून झाला हा गोंधळ....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्‍टरने स्वतः संशयित असल्याचे सांगत जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले नाहीत, असा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली; मात्र स्वतःहून क्‍वारंटाईन न झाल्यामुळे त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोप फेटाळले आहेत.

शुक्रवारी (ता. २०) हा  प्रकार पुढे आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील वैयक्‍तिक मतभेद चव्हाट्यावर आले. दुबईहून रत्नागिरी जिल्ह्यात आलेला एक कोरोनाचा रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवला आहे.
 त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने जिल्हा शल्य चिकित्सकांविरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली. रुग्णावर उपचार करताना कोरोनासदृश्‍य स्थिती असून कोणतेही उपचार केले गेले नसल्याचे त्या महिला डॉक्‍टरने तक्रारीत म्हटले आहे. 

स्वतः क्‍वारंटाईन न झाल्याने गुन्हा वरिष्ठांवर आरोप

या प्रकाराबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक निलप्पा बोल्डे  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित वैद्यकीय अधिकारी कोरोना आजाराने संशयित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी डॉ. प्रकाश जांभुळकर यांनी त्यांची तपासणी केली. त्यांना बाह्यरुग्ण पत्रिकेवर कोरोना संशयित विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात दाखल व्हा असे सांगितले; संशयित डॉक्‍टर महिलेने आयसोलेशन कक्षात आंतररुग्ण म्हणून दाखल होण्याची तोंडी हमी दिली.

संशयित महिला डॉक्‍टर यांना घशातील द्रव्याचे नमुने घेतले. त्या कोरोना संशयित विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या नाहीत.  जीवितास धोका असलेला संसर्ग आहे. हे माहित असूनही त्यांनी मानवी जीवितास धोका पोचेल अशी कृती केली. तसेच वैद्यकीय सुरक्षा पाळण्याकडे दुर्लक्ष करुन जिल्हाधिकारी यांच्याकडील नैसर्गिक आपत्ती कोरोना विषाणू 2019 अन्वये जारी केलेल्या आदेशाची अवहेलना केली. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम २६९, २७०, १८८, इपिडेमिक डिसीज ॲक्‍ट १८९७ अन्वये गुन्हा दाखल केला. 

नमुने पाठविले नाही म्हणणे चुकीचे
महिला डॉक्‍टरचे नमुने पाठविले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. सकाळी  नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. त्या महिला डॉक्‍टरला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मी त्यांना ॲडमिट व्हा, असे सांगितले; मात्र त्या दाखल झाल्या नाहीत. त्यांचा दूरध्वनीवरूनही संपर्क होऊ शकला नाही. रात्री १० वाजेपर्यंत शोधाशोध सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT