sakal
कोकण

रत्नागिरी: अधीक्षक डॉ. गर्ग यांची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'कडून दखल

कोरोना, पूरपरिस्थितीत उत्कृष्ट कार्य ; लंडनच्या संस्थेकडून प्रमाणपत्र

राजेंद्र शेळके

रत्नागिरी: कोरोना महामारी काळात जिल्ह्यात गावं दत्तक घेऊन संसर्ग रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न, पोलिस कर्मचारी, कुटुंबीयांसाठी शिबिरे, स्वतंत्र कोविड सेंटर उभारणे तसेच जुलैच्या महापुरामध्ये पोलिस दलाने सर्वांत प्रथम पोहचून केलेली मदतीची दखल महाराष्ट्राने घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या या उल्लेखनीय आणि सामाजिक कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल घेण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या संस्थेने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार घेतल्यानंतर दलाला वेगळी शिस्त त्यांनी लावली. कायदा व सुव्यवस्थेच्या चाखोरीतून बाहेर पडून सामाजिक कार्यात या दलाने चांगला ठसा उमटवला आहे. कोरोना महामारीमध्ये तर दलाने कौतुकास्पद काम केले. आरोग्य विभाग, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून संसर्ग रोखण्यासाठी काही ठोस पावले उचलली. ज्या भागात जास्त संसर्ग आहे अशी शेकडो गावे दलाने दत्तक घेतली. त्या भागात पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी काम करून संसर्ग रोखण्यात ते यशस्वी झाले. पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनापासून लांब ठेवण्यासाठी मेडीकल कीट पुरवणे, पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी स्वतंत्र भव्य आणि आधुनिक कोविड सेंटरही सुरू केले.

चिपळूण, खेड, राजापुरात २२ जुलैला महापुराने थैमान घातले. या पूरस्थितीमुळे हजारो कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले होते. अशावेळी मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस सर्वप्रथम चिपळुणात पोहचले. कोरोना रुग्ण असतील वा इतर नातेवाईक यांना बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न केले. कोरोना काळात गावागावात बैठका घेऊन पोलिसांनी जनजागृती केली. डॉ. गर्ग यांचे कोरोना महामारी आणि महापुरामध्ये पोलिस दलाने सामाजिक भान ठेवून केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल महाराष्ट्रानेच नव्हे तर वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने घेतली. संस्थेने डॉ. गर्ग यांना नुकतेच प्रमाणपत्र मेल करून त्याच्या कामाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT