रेवा कासव sakal
कोकण

रत्नागिरी : ‘प्रथमा’ कासव पोचले गुजरात किनाऱ्‍याजवळ!

सर्वाधिक ३३० किमीचा प्रवास; सावनी, रेवा, वनश्री दक्षिणेकडे

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ने गुजरातचा किनारा गाठला आहे. या कासवाने सर्वाधिक ३३० किलोमीटरचा प्रवास केला आहे; तर सावनी आणि वनश्री यांनी रेवा कासवाच्या दिशेने आणखी दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून, ते कारवारपासून ४०, तर मंगळूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे.

कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करून अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’कडून पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत पाच कासवे सोडण्यात आली. त्यातील लक्ष्मी हे कासव महिन्याभरातच संपर्काबाहेर गेले; तर उर्वरित चार कासवांची सद्यःस्थितीवर कांदळवन विभागाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे लक्ष ठेवून आहेत.

वेळास, आंजर्ले, गुहागर या किनाऱ्‍यांवर अंडी घालून समुद्रात जाणाऱ्‍या कासवांना टॅगिंग केले असून, त्यांना नावेही देण्यात दिली आहेत. यातील ‘प्रथमा’ नामक कासवाचा प्रवास पुढेच सुरू असून, ते गुजरातच्या किनाऱ्‍यावर पोचले आहेत. आतापर्यंत वेळासपासून प्रथमाने ३३० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ते सध्या दीव किनाऱ्‍यापासून ६५ किमी अंतरावर आहे. सावनी हे सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुमारे ९० किमी सरळ रेषेत प्रवास करत आहे. रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून आणि गोवा ओलांडून ती कर्नाटकच्या पाण्यात शिरली आहे. सध्या कर्नाटकातील कारवारपासून ४० किमी अंतरावर आहे. वनश्री किनाऱ्‍यानेच दक्षिणेकडे जात असून, ती सध्या आंबोळगड किनाऱ्‍यापासून सुमारे २५ किमी सरळ रेषेत आहे.

टॅगिंग केलेल्या कासवांचा प्रवास सुरू आहे. त्यांच्याविषयीची निरीक्षणे केली जात आहेत. वर्षभरानंतर त्यांच्या एकूण प्रवासातील घटनांवरून निरीक्षणे नोंदवता येतील.

- हर्षल कर्वे,

  • सागरी जीवशास्त्रज्ञ, कांदळवन प्रतिष्ठान

  • असा सुरू आहे कासवांचा प्रवास...

  • ‘प्रथमा’ वेळासपासून ३३० कि. मी. प्रवास, दिवपासून ६५ किमीवर

  • ‘सावनी’ महाराष्ट्र किनाऱ्‍याला समांतर ८० किमी

  • वनश्री आंबोळगडपासून २५ किमी

  • रेवा कारवारपासून ४० किमी समुद्रात, मंगळूरकडे प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT