ratnagiri Forest Department Life saving female of leopard 
कोकण

...अन् बिबट्या मादीला दिले असे जीवदान 

सकाळ वृत्तसेवा

राजापूर :  तालुक्यातील हसोळतर्फे सौंदळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत काल बिबट्या पडल्याची घटना घडली. वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनीत्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.


सुमारे एक ते दिड वर्षे वयाची ही बिबट्याची मादी असून भक्ष्याच्या शोधात असताना ती विहिरीत पडली असावी असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तिची वैद्यकीय तपासणी करन नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

 कालसायंकाळी महंमंद मिर हे विहिरीचे पाणी सोडण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीत आत बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावात माहिती दिली. त्यानंतर मिर यांनी राजापूर वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने विहिरीत पिेंजरा सोडून या बिबट्याला बाहेर काढले. यांनंतर त्याची वैद्यकिय तपासणी करून त्याला तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडले. याप्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

विभागिय वनअधिकारी रमाकांत भवर, परिक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक संजय रणधीर यांसह सहकारी दिपक चव्हाण, दिपक म्हादये, विजय म्हादये यांनी मोलाची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT