shivsena
shivsena sakal
कोकण

रत्नागिरी : एकनिष्ठतेचे फळ; उपनेतेपद सोपवत बळ

राजेश नागरे

रत्नागिरी : शिवसेनेच्या उपनेतेपदी आमदार राजन साळवी यांची निवड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील सर्वात जुन्या कार्यालयात शिवसैनिकांनी आमदार साळवींना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तेथे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावत आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये आमदार साळवींचे स्वागत करण्यात आले. कुणी पेढे वाटत होते, तर कुणी लाडू. प्रत्येकाचा चेहरा नवीन ऊर्जा मिळाल्याचे सांगत होता. साळवींच्या स्वागतानिमित्ताने शिवसैनिक एकवटलेला दिसला. बंडानंतरही पक्षाची ही ऊर्जा लक्षणीय होती.

नगरविकासमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचा परिणाम सेनेच्या कोकणातील बालेकिल्ल्यात जाणवत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम हे मोहरे बंडाच्या बाजूने उभे राहिल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. गेल्या पाच दिवसांमध्ये नेत्यांकडून कोणतेच आदेश न आल्यामुळे संभ्रमावस्था होती. त्यातून शिवसैनिकांना सावरण्यासाठी आमदार राजन साळवींना बळ देत उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे वृत्त दाखल झाल्यानंतर साळवींच्या समर्थकांसह सर्वच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, उदय बने, रोशन फाळके, प्रमोद शेरे, आबा घोसाळे, प्रशांत साळुंखे, राहुल पंडित, संदीप सुर्वे, अविनाश कदम, नितीन तळेकर, राजन शेटये, बाळू साळवी, शेखर घोसाळे, विजय खेडेकर, महेश पत्की, किरण तोडणकर, अभय खेडेकर, राजू शिंदे, संतोष सावंत, प्रसाद सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

समाधानाचे वातावरण

राष्ट्रवादीमधून मंत्री सामंत यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनीही आठवडा बाजारातील कार्यालयात हजेरी लावली होती. साळवींच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते. बंडाच्या परिस्थितीत आमदार राजन साळवी ‘मातोश्री’ बरोबर राहिल्यामुळे एकनिष्ठेचे फळ मिळाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरु होती. मंत्री सामंतांच्या बंडामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करण्याची जबाबदारी आमदार साळवींवर जबाबदारी दिली आहे.

निवडीचा आनंद साजरा

एकनिष्ठ आणि जुना शिवसैनिक म्हणून ओळख आहे. रत्नागिरीतील आठवडा बाजार हे शिवसेनेचे जुने संपर्क कार्यालय आहे. पूर्वी याच ठिकाणाहून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे कामकाज चालवले जात होते. निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसैनिकांनी बुधवारी (ता. २८) हीच जागा निवडत सकाळपासूनच गर्दी केली होती. कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात दाखल झाले. पेढे, लाडू वाटप करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT