Ganesh Visarjan news file photo esakal
कोकण

Ratnagiri Ganesh Visarjan : गुहागरमध्ये विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला; एका अल्पवयीन मुलीसह 2 ठार

जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी हालवण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर इथं गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. गणेशमुर्ती असलेल्या वाहनाचे ब्रेक फेल होवून वाहन थेट मिरवणुकीत घुसल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 17 वर्षाच्या मुलीसह एक प्रौढ व्यक्ती मृत्युमुखी पडला, तर 5 जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर तिघांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आलं. या दुर्घटनेमुळे पाचेरी आगर गावावर शोककळा पसरली आहे. (Ratnagiri Ganesh Visarjan 2 Killed including a minor girl during Immersion procession in Guhagar)

टेम्पोचा ब्रेक फेल

अनंत चतुर्दशी असल्यानं गावागावात गणेश विसर्जनाचा सोहळा सायंकाळपासून सुरू झाला. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात विविध घरातील गणेश मुर्तींचे सामुहिक विसर्जन केले जाते. सायंकाळी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणुक वाजतगाजत विसर्जन घाटाकडे जात होती. सायंकाळी 4.45 च्या दरम्यान मिरवणुकीत गणपती ठेवलेल्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि हा टेम्पो मिरवणुकीत नाचणाऱ्या गणेशभक्तांमध्ये घुसला.

तीन अल्पवयीन मुलं जखमी

या दुर्घटनेत कोमल भुवड (वय 17, रा. पाचेरीआगर) व दिपक भुवड (वय 48, रा. पाचेरीआगर) हे दोघे टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्युमुखी पडले. तर दिया रमेश भुवड (वय 16) व तेजल संदिप पाष्टे (वय 20), रिया रामचंद्र वेलोंडे (वय 12), स्नेहल संदिप पाष्टे (वय 23) आणि उषा गुणाजी पाष्टे (वय 56) जखमी झाले आहेत. सर्वांना आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांकडून चौकशी सुरु

या अपघाताचं वृत्त कळताच गुहागर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाठपोठ चिपळुण, गुहागरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने देखील घटनास्थळी पोचले. आबलोली व पाचेरी आगर येथील घटनास्थळी पोलीसांकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT