Jaigad beach House Boating
Jaigad beach House Boating sakal
कोकण

House Boating : जयगड, दाभोळ खाडीत हाऊसबोटींग

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - पर्यटनाला चालना देतानाच महिलांना रोजगारसंधी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सिंधु-रत्न योजनेत दोन कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत.

जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.

यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्‍यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.

पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दोन्ही खाडीत काय पाहता येईल?

* वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) - कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.

* जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर) - कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र.

जिल्ह्यातील खाड्यांच्या संथ पाण्यात हाऊसबोटिंगच्या माध्यमातून महिला बचतगटांना पर्यटन व्यवसाय करणे शक्य आहे. त्यासाठीच दोन खाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवण्यात येत आहे. परिपूर्ण प्रस्ताव दिलेला असून, लवकरच त्यावर कार्यवाही होईल. भविष्यात काजळी खाडीमध्येही हाऊसबोट सुरू करण्याचा विचार आहे.

- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सिंधु-रत्न योजनेमध्ये हाऊसबोटीचा प्रस्ताव सादर केला आहे तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नऊ बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. एक बसची किंमत ४० लाख असून, महिला बचतगटांना पर्यटन व्यवसायातून उत्पन्न मिळू शकेल.

- एन. बी. घाणेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

पॉइंटर

* पर्यटनाला चालना

* सिंधु-रत्न योजनेतून निधी

* एका हाऊसबोटची किंमत एक कोटी

* एकावेळी दोन कुटुंबांना राहता येईल

* जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पुढाकार

* १२ महिलांनी केला केरळचा दौरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT