कारमधून रिव्हॉल्व्हर, ५ जिवंत राऊंड जप्त sakal
कोकण

रत्नागिरी : कारमधून रिव्हॉल्व्हर, ५ जिवंत राऊंड जप्त

हातखंब्यात कारवाई ; पुण्यातील दोघा संशयिताना अटक

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे कारमधून आलेल्या पुण्यातील दोघा संशयिताकडुन विनापरवाना रिव्हॉल्व्हर आणि ५ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

प्रेम वर्मा अलकुंटे (वय २५) आणि सागर कुमार अलकुंटी (वय ३०,रा.शंकर साई मठ,हडपसर,पूणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हेड काँस्टेबल प्रवीण खांबे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी पहाटे हे दोघेही आपल्या ताब्यातील कारमधून (एमएच-४६-एएक्स-९४१२) हातखंबा येथील शांती ढाब्यासमोरुन जात होते.

रात्रीच्या गस्तीला असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संशयितांच्या गाडीची तपासणी केली. तेव्हा प्रेम अलकुंटे याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत राऊंड मिळून आले.

याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सूर्य करत आहेत. कारमधून विनापरवाना जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरची किंमत ४८ हजार ५०० रुपयांचे आहे. आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्यास संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT