leopard
leopard  sakal
कोकण

रत्नागिरी : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा जखमी

सकाळ वृत्तसेवा

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वाशी सहाणेची वाडी येथे सोमवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने घरात शिरुन वृद्धेवर हल्ला केला. यात वृद्धा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सात टाके घालण्यात आले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दोन तासांच्या मोहिमेनंतर स्थानिकांच्या मदतीने या नराला पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचे नाव कलावती शांताराम कुळ्ये ७५ असे आहे. यात जखमी झालेल्या महिलेवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. तालुक्यातील वाशी सहाणेची वाडी येथील लीलावती कुळ्ये ह्या आपल्या घरी एकट्याच राहतात. त्या नेहमीप्रमाणे घरी झोपलेल्या असताना त्यांना कोंबड्यांचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. कोंबड्यांची शिकार करायला आलेल्या बिबट्याने या वृद्धेवर हल्ला केला. हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

आरडाओरडा होताच शेजारचे लोक घटनास्थास्थळी दाखल झाले. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढले. उपचारासाठी सुरेश गंगाराम खांडेकर, शांताराम करंडे, प्रतीभा भोल्ये यांनी तत्काळ दाखल केले. मात्र, बिबट्या घरातच अडकला. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी कुळ्ये गावाचे पोलिस पाटील इंदुलकर यांनी वनविभागाला माहिती दिली. यानुसार श्रीमती कलावती काशीराम कुळ्ये यांच्या घराकडे धाव घेतली.

बिबट्या पकडण्यासाठी विभागीय वनअधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुळ्ये येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक एनएस गावडे, सूरज तेली, आकाश कडूकर, संजय रणधीर, तसेच सरपंच, पोलिसपाटील व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बिबट्यास पिंजरा लावून सुस्थितीत पकडण्यात आले.

बिबट्याचे वय सात वर्षे

या बिबट्याचे वय अंदाजे सात वर्षे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांच्याकडून वैद्यकीय तपासणी तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. याचा पंचनामा करण्यात आला असून औषधोपचारासाठी देय असलेली रक्कम शासनाच्या वतीने देण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी सांगितले

टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधा

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी गावात आढळून आल्यास किंवा अनैसर्गिकरित्या आढळून आल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या नंबरवर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने करण्यात येत आहे.

एक नजर..

  • लीलावती कुळ्ये घरी एकट्याच होत्या

  • कोंबड्यांचा आवाजामुळे झोपेतून झाल्या जाग्या

  • कोंबड्यांच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याचा हल्ला

  • हल्ल्यात वृध्दा गंभीर जखमी; केला आरडाओरडा

  • प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढले

  • बिबट्या घरातच अडकला; वनविभाग झाले दाखल

  • बिबट्यास पिंजरा लावून सुस्थितीत पकडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT